राशीभविष्य : वैदिक पंचांगानुसार, आज १८ एप्रिल २०२६ , आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीसाठी आजचा दिवस बरीच कामे साध्य होऊन जातील, तुमच्या मनाप्रमाणे काम करायला मिळेल, तुम्हाला आवडेल तिथे तुम्हाला काम करावे लागेल
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीसाठी तुमच्या कर्तुत्वाला झळाळी देणारे ग्रहमान असले तरी, कष्टाला सीमा राहणार नाही त्यामुळे थोडे कंटाळून जाल
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीसाठी आज प्रकृती अस्वस्थ थोडे जाणवेल, विचार थोडे भरकटण्याची शक्यता आहे महिलांना त्यांच्या कामाची पावती मिळेल
कर्क रास (Cancer)
कर्क राशीसाठी आज ज्यांना पाठीचे दुखणे रक्तदाब यांचा त्रास आहे, त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे, थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती होईल
सिंह रास (Leo)
सिंह राशीसाठी आज कोणतेही काम वेळेवर पूर्ण होणार नाही आर्थिक घरी चांगली बसल्यासारखी वाटली तरी खर्चामुळे पैशाला अनेक वाटा फुटतील
कन्या रास (Virgo)
कन्या राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात थोड्या गढूळ वातावरणाला सामोरे जावे लागेल, जीव तोडून वरिष्ठांना सांगितले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही
तूळ रास (Libra)
तूळ राशीसाठी आजचा दिवस आज शांत राहणे हितावह ठरेल, महिला थोड्या तापट बनतील थोडा हेकेखोर पणा वाढेल जुनी आणि वसूल होतील
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात कष्ट पडले तरी, कामे पूर्ण होतील कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला मानल्यास फायदा होईल
धनु रास (Saggitarius)
धनु राशीसाठी आजचा दिवस शत्रूंच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत, तरी त्रास मात्र होणार आहे. कुटुंबामध्ये बरेच दिवसापासून चाललेला एखादा वाद संपुष्टात येईल
मकर रास (Capricorn)
मकर राशीसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला हवी तशी परिस्थिती न मिळाल्यामुळे थोडे त्रासून जाल, महिलांना समजूतीचे धोरण स्वीकारायला लागेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस कर्तव्याला श्रेष्ठ मानण्यात धन्यता वाटेल, मानसन्मान मिळेल
मीन रास (Pisces)
मीन राशीसाठी आजचा दिवस बऱ्याच कामांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर टाकण्यात येतील, त्यासाठी जीवाचे रान कराल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)




