पिंपरी चिंचवड – काही लोकांसह आता महायूतीचे नेते आणि पदाधिकारी देखील मोदींच्या भक्तीत मग्न झाले आहेत. असाच काही प्रकार पिंपरी चिंचवडमधून समोर आला. येथे एक घटना दुरूस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर कांग्रेस आणि मित्रपक्षांचा निषेध करण्यासाठी जमलेल्या महायूतीच्या नेत्यांनी आपल्याच सरकारविरोधात घोषणा दिल्या. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा देऊन त्यांनी परिसर दणाणून सोडला. आपन आपल्याच सरकारविरोधात घोषणाबाजी करत असल्याचे लक्षात येताच त्यांची तारांबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये सोमवारी एका घटना दुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि मित्रपक्षांचा निषेध करण्यासाठी महायूतीच्या नेत्यांनी निदर्शनांचे आयोजन केले होते. या आंदोलनात भाजप आमदार उमा खापरे, माजी महापौर रवी लांडगे आणि सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासोबतच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वांना आपल्याच सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
प्रशांत शितोळे यांनी ‘या सरकारचं करायचं काय?’ अशी घोषणा दिली. त्यावर त्यावर आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे आणि उपस्थित नगरसेवकांनी कोणताही विचार न करता ‘खाली डोकं, वर पाय’ अशी जोरात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. एकदा चूक झाल्यानंतर शितोळे यांनी पुन्हा एकदा ‘एनडीए सरकारचं करायचं काय?’ अशी घोषणा दिली. यावरही कार्यकर्त्यांनी कोणताही विचार न करता पुन्हा एकदा ‘खाली डोकं, वर पाय’ अशी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
प्रशांत शितोळे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एनडीए सरकारचं करायचं काय? यावर अंधभक्तीत मग्न झालेल्या उपस्थित पदाधिकारयांनी पुन्हा एकदा जोरात ‘खाली डोक वर पाय’ अशा घोषाण दिल्या. केंद्रात आणि राज्यात आपलच सरकार असताना आपण आपल्याच सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहोत, हे लक्षात येताच नेत्यांची तारांबळ उडाली.
शेवटी आमदार उमा खापरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत ‘एनडीए सरकारचा वियज असो’, अशी घोषणा देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या निषेध आंदोलनाने भाजपचे नेतेही कपाळावर हात मारून घेत असून विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.





