भाजपा नगरसेवका विरुद्ध फसवणुक व धमकी देऊन महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल; लग्नाचे आमिष देऊन ऑफिस व लॉज वर अत्याचार केल्याचा आरोप

SHARE:

मुंबई – भाजपा नगरसेवकाविरुद्ध फसवणुक व धमकी देऊन महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये लग्नाचे आश्वासन देऊन ऑफिस, लॉजवर महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील मिरा-भाईंदर परिसरातील भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा-भाईंदर परिसरात एका महिलेने भाजपा नगरसेवकांवर अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

या घटनेने मिरा-भाईंदरमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, मिरा रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६९ आणि ३५१(२) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिरा-भाईंदरमधील पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, जुलै २०२२ मध्ये आरोपी भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगमने तिला मिरारोड पूर्व येथील आपल्या कार्यालयात बोलावले होते.

तेथे लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने विरोध केला असतानाही विविध ठिकाणी कार्यालय, लॉज तसेच इतर ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगमने दिल्याचाही उल्लेख महिलेने तक्रारीत केला आहे. या सर्व प्रकारामुळे ही पीडित महिला दहशतीखाली होती. ही महिला मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचेही समोर आले आहे. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही.

त्यामुळे मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अत्याचाराचा मुद्दा समोर आल्यानंतर मुंबईतील पोलिस यंत्रणेनेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मुंबईत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी भाजपा नगरसेवक लक्ष्मण जंगमवर कडक कारवाई करण्याची मागणी मिरा-भाईंदरमधील नागरिकांनी केली आहे. या प्रकरणात मिरा रोड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही भाजपा सरकार विरोधात जोरदार टीका झाली आहे. विरोधी पक्षांनी या घटनेवरून भाजपावर टीका केली आहे.

मुंबईतील संबंधित भाजपा नगरसेवक लक्ष्मण जंगमवर कडक कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तसेच, राज्यात महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांनी भाजपा सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

मुंबई पोलिसांकडून पीडित महिलेचे जबाब नोंदवले आहेत. आरोपी भाजपा नगरसेवक लक्ष्मण जंगम विरोधात चौकशी सुरू आहे. मुंबईतील संबंधित अत्याचाराच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि इतर बाबींची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अधिक तपास मुंबई पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा