नाशिक – जिल्ह्यात जमिनीच्या वादातून 2 महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याची घटना घडली आहे. आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडले आहे. घटनेने नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावामध्ये मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये वादग्रस्त शेत जमिनीवर नांगरणी सुरू असताना ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात शेत जमिनीच्या वादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना शेतात दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये मोठा वाद झाला आहे. या वादातून जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला आहे, व जोरात धडक बसल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी या दोन महिला या घटनेत जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपींच्या विरोधात नाशिकमधील पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात भावबंदकीच्या शेतजमिनीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचेे समोर आले आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेल्या शेतजमिनीवर जबरदस्तीने शेतजमीन नांगरण्याचा प्रयत्न करत 2 महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आरोपींवर केला आहे.
या घटनेत 2 महिला जखमी झाल्या आहेत. न्यायालयाचा आदेश असतानाही जबरदस्तीने शेतजमिनीत प्रवेश केल्याचा आरोप आहे. असे असताना ही पिंपळगाव बसवंत पोलिसांनी आरापेींवर किरकोळ गुन्हे दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून आरापी विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






