नवी दिल्ली – अगोदरच महागाईने मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. महागाईपासून दिलासा मिळेल अशी प्रतिक्षा करणार्या जनतेवर सातत्याने महागाई लादली जात आहे. दूध, पाव, सीएनजी, एलपीजी नंतर गेल्या 10 दिवसांतच पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कातरी लागली आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. एप्रिलमध्ये घाऊक महागाई दुप्पटीने वाढली तर किरकोळ महागाई देखील वाढली आहे. या दरम्यान सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लावणारी चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दहा दिवसांतील इंधनाच्या दरात वाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे.
या नव्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे. नागपूर मध्ये पेट्रोल 111.70 रुपये झाले आहे तर डिझेल 98.76 रुपये प्रतिलीटर झाले. कोल्हापूरात पेट्रोल 111.77 रूपये प्रतिलीटर तर डिझेल 98.46 रूपये प्रतिलीटर झाले आहे. गोंदियात पेट्रोल 113.17 रूपये प्रतिलिटर तर डिझेल 99.83 रूपये प्रतिलीटर झाले आहे. अमरावतीत पेट्रोल 112.78 रूपये प्रतिलीटर तर डिझेल 98.43 रूपये प्रतिलीटर झाले आहे.
माहित असावे कि कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्यानं तेल कंपन्यांना दररोज हजारो कोटींचा तोटा होत आहे. त्यामुळे भारतातील इंधन तेलाच्या दरात वाढ केली जात आहे. मात्र जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या होत्या तेव्हा भारतात पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी व्हायला पाहिजे होत्या. मात्र असे झाले नाही. तेव्हा देखील भारतात चढ्या भावानेच पेट्रोल- डिझेल विकण्यात आले. आता जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत, तेव्हा भारतात पेट्रोल- डिझेलच्या किमती सातत्याने वाढवल्या जात आहेत.
अवघ्या 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा झालेल्या या दरवाढीने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. या दरवाढीचा फटका दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर बसणार असून बस, टॅक्सी आणि वाहतुकीचा खर्च देखील वाढू शकतो. ज्यामुळे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतच राहिल्या, तर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढू शकतात, ज्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर सर्वसामान्यांची चिंता आणखी वाढेल.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






