जालना – जिल्ह्यात डिझेल भरण्यावरून पेट्रोल पंपावर हाणामारी झाली आहे. मॅनेजरला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातदोन हजार रुपयाचे डिझेल का देत नाही? या कारणावरून जालन्यात पेट्रोल पंपावर हाणामारी झाली आहे. या घटनेत पंप मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे.
राज्यात एकीकडे इंधनाचा कुठलाही तुटवडा नसून पेट्रोल पंपावर सुरळीत पेट्रोल-डिझेलचा साठा असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत.
जालना जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे वादाच्या घटना घडत आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून मराठवाड्यात पेट्रोल पंपाबाहेर ड्रम घेऊन ग्राहकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, जालन्यातील वाटूर फाटा येथे डिझेल भरण्यावरून पेट्रोल पंपावरच भयंकर हाणामारीची घटना घडली आहे. सोमवारी रात्री झालेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन हजार रुपयांचे डिझेल का टाकत नाही म्हणत पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.
जालना जिल्ह्यातील पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्यानंतर पेट्रोल पंपाला आग लावल्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात पेट्रोल पंपाला आग लावल्याची धमकी आणि मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपी विरोधात जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे मारहाणीच्या घटना पेट्रोल पंपावर घडत आहेत. राज्यातील इंधन टंचाईचे वास्तव समोर आले आहे.
जालना जिल्ह्यातील वाटुर फाटा येथे वाहन रांगेत न लावता दोन हजार रुपयाचे डिझेल भरण्याची मागणी दोन जण करत होते. याप्रकरणात पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. व संशयित आरोपीनी पेट्रोल पंप माचिसने जाळण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पेट्रोल डिझेलचा साठा जास्त कोण कर आहे, याची चौकशी करा.
राज्यात सध्या नेहमीपेक्षा 52 टक्के जास्तीचे इंधन खरेदी होत आहे, हे 52 टक्के इंधन खरेदी कोण करते आहे याचा शोध घ्या, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यात सध्या पुरेसा इंधनासाठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून देण्यात आली आहे. मात्र, राज्यात इंधन टंचाईच्या अफवेमुळे व गैरसमजामुळे नागरिकांची इंधन खरेदी अचानक वाढल्याने इंधन टंचाई जास्त होण्याची शक्यता आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






