बंगळुरू – कर्नाटक सरकारमध्ये लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, अनुसूचित जातीसह इतर समुदायांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये नव्या सरकारचा शपथविधी पार पडला आहे. कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी. के. शिवकुमार यांना कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. यानंतर राज्यपालांनी डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.
बंगळुरू येथील कर्नाटक लोकभवनात नव्या सरकारचा शपथविधीचा सोहळा पार पडला आहे. कर्नाटक राज्यामधील डी. के. शिवकुमार यांच्या नवीन सरकारमध्ये वोक्कालिगा, दलित, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, अनुसूचित जमाती आणि इतर समुदायांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. कर्नाटक राज्यात सामाजिक संतुलन साधल्याचे कर्नाटक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्वतः वोक्कालिगा समुदायाचे आहेत, तर उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर हे अनुसुचित जातीचे आहेत. ही माहिती पण कर्नाटकातील काँग्रेसपक्षाकडून देण्यात आली आहे.
कर्नाटकच्या नवीन सरकारमध्ये डॉ. जी. परमेश्वरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहे. केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी, कृष्णा गौडा, प्रियांक खर्गे, यूटी खादर, ईश्वर खांद्रे, यतींद्रामा पाटील आणि सुदरेश अण्णा पाटील यांनीही कर्नाटक राज्याच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या आधी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी वाढू लागल्याचे पाहून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार आणि कर्नाटक काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.
या चर्चेत अखेर डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे. काँग्रेसमधील पक्ष नेत्यांचे आदेश आल्यानंतर कर्नाटक काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकमत झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांची कर्नाटकच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. नंतर डी.के. शिवकुमार यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी डी. के. शिवकुमार यांना बुधवार ३ जून 2026 रोजी संध्याकाळी शपथविधी होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले आहे. यानंतर जाहीर केलेल्या कर्नाटकातील सरकारी कार्यक्रमानुसार डी. के. शिवकुमार यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.
काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे एकूण 1,413 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून आंध्र प्रदेशच्या एन. चंद्राबाबू नायडू यांचे नाव आहे. त्यांच्याकडे 931 कोटी रुपयांची संपत्ती आहे. देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसर्या स्थानावर टीव्हीकेचे संस्थापक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आहेत, त्यांच्याकडे 648 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
डी. के. शिवकुमार हे 1989 पासून सलग 8 वेळा कर्नाटक राज्यातील विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. कर्नाटक राज्यामधील कनकपुरा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहे. कनकपुरातील व्यावसायिक या नावांनीही ते ओळखले जातात. डी. के. शिवकुमार हे कर्नाटक राज्यामधील राजकारणी असण्याव्यतिरिक्त ते उत्तम व्यावसायिक आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






