आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अमरावती आगमनानिमित्य विशेष अभंग…

SHARE:

आदर्श, प्रामाणिक, सत्यप्रिय, जनप्रिय अधिकारी महाराष्ट्राचे FDA आयुक्त मा. श्री. तुकाराम मुंढे साहेबांचे दि.१ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती येथे आगमन होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या सत्य, प्रामाणिक जनसेवेच्या कार्यावरील अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी शब्दबद्ध केलेला अभंग वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

सदाचारी तुकाराम मुंढे 

अमरावतीला । तुकाराम आले ।
आनंदात न्हाले । जनमन ॥
अन्न व औषध । प्रशासन भार ।
भ्रष्टांवर वार । करितसे ॥
तुकाराम मुंढे । हिरा आहे छान ।
गावे गुण-गान। सर्वांनीच ॥

लोकहितासाठी । झटताहे मुंढे ।
सदाचारी मुंढे । तुकाराम ॥
महाराष्ट्री आज । तुकाराम नाम ॥
भ्रष्टांना लगाम । लावियली ॥
दररोज सुरू । सत्याची सफर ।
मुंढेंचा गजर । महाराष्ट्री ॥

कायद्याचे राज्य । समाजात हवे ।
जन गीत गावे । मुंढेजींचे ॥
भेसळ सम्राट I गल्लो गल्ली झाले ।
जनांना कळले । उशिराच ॥
बदलीला मुंढे । नाही घाबरले ।
कधी ना खचले । जीवनात

कडक शिस्तिचा । सत्य अधिकारी ।
कार्यालयी वारी । दररोज ॥
अफाट जिद्दीचे । तुकाराम एक ।
कार्य करी नेक । जनांसाठी ॥
भ्रष्टाचारी जना । रुचलाच नाही ।
पचलाच नाही । तुकाराम ॥

भ्रष्टाचाऱ्यांची ही । कंबर मोडली ।
तयांना घडली । जेलवारी ॥
सत्य कार्याला मी । करितो सलाम ।
करांनी प्रणाम । मुंढेजींना ॥
अमरावतीला । आज आगमन ।
आनंदले मन । सर्वांचेच ॥

 

लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
अभंगकार, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment