जेष्ट सामाजिक प्रबोधनकार भास्करराव भटकरांना ‘राज्यस्तरीय श्री गुरुदेव जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान…

SHARE:

अमरावती/पंढरपूर : पद्मश्री फाउंडेशन, नागपूर आणि गुरुदेव पंढरपूर देवदर्शन यात्रा समिती, गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या वतीने ग्रामगीता तत्त्वज्ञान मंदिर, पंढरपूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रचारक, सामाजिक प्रबोधनकार आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. भास्करराव भटकर (अमरावती) यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “राज्यस्तरीय श्री. गुरुदेव जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

पद्मश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्री. संजयजी आदमने साहेब यांच्या हस्ते भास्करराव भटकरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते भावूक वातावरणात गौरविण्यात आले.

व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला अनेक विचारवंत आणि साधू-संतांची उपस्थिती लाभली होती. व्यासपीठावर प्रामुख्याने :
डॉ. श्री. संजयजी आदमने साहेब (अध्यक्ष, पद्मश्री फाउंडेशन, नागपूर)
आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी
ह.भ.प. साबळे महाराज (अध्यक्ष, रामकृष्ण हरि मंदिर, गुरुकुंज आश्रम मोझरी)
ह.भ.प. विदर्भ केसरी कीर्तनकार लक्ष्मणराव काळे महाराज
श्री. भानुदासजी कराळे महाराज (अध्यक्ष, पंढरपूर देवदर्शन यात्रा समिती, अकोला)
श्रीमती श्रीदेवी साबळे (समिती सदस्या)
श्री. सेवकरामजी (संचालक, तुकाराम दादा आध्यात्मिक ग्रामगीता केंद्र, पंढरपूर)
श्री. शंकरराव मोहड (उपाध्यक्ष)
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य श्री. प्रमोददादा भोंगे (वर्धा) यांनी केले. या सोहळ्यास मोठ्या संख्येने गुरुदेव प्रेमी, उपासक, प्रचारक व नागरिक उपस्थित होते.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment