नागपूर : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर अँड न्यूज कॅमेरामन वेल्फेअर असोसिएशन, नागपूरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, पोलीस लाइन टाकळी येथे विशेष कार्यक्रम आणि मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रेस फोटोग्राफर आणि न्यूज कॅमेरामनने सामन्यात सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेश परिषदेचे सदस्य जयहरी सिंह ठाकूर, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव आणि सेवानिवृत्त पीएसआय किशोर सोलाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यापुढेही दरवर्षी अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशी इच्छा मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी सदस्यांनी रात्रीच्या भोजनाचा कार्यक्रम रद्द करून ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या फ्रीलान्स फोटोग्राफर मधु कुमरे यांना आर्थिक मदत देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजसेवक नरेंद्र जिचकार, नरेश बार्डे आणि नागपूर शहर पोलीस विभागाचे विशेष सहकार्य लाभले.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






