संत श्री गजानन महाराज…

SHARE:

श्री संत गजानन महाराज यांच्या वर आधारित श्री. संजय अण्णाजी देशमुख यांची कविता वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत..

शेगावीचा राणा…

भाव अंतरीचा देवा
अर्पी चरणाला,
कृपावंत अन् दयाळा
मोल वचनाला,

तुची कर्ता करविता
दु:खिता तारता,
नाम घेता देवा गजानन
उभा तू विधाता,

नको तुला हार फूल
श्रध्देचा भुकेला,
कांदा झूनका भाकर ठेचा
बुटी चिलमेला,

असाध्यही करुनी साध्य
संता कीर्ती आला,
भोळ्या भाबड्या भक्तांचा
देव तुची झाला,

चालू गाडी थांबुनिया
पाडीले कोड्यात,
पाणी लावले अकोलीला
कोरड्या आड्यात,

घेतली संजीवन समाधी
ऋषी पंचमीला,
बोल ठेऊनिया गेले
आहे शेगावला…

 

लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
साहित्यिक व कवी

संजय अण्णाजी देशमुख
Author: संजय अण्णाजी देशमुख

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..

Leave a Comment