नांदगाव खंडेश्वर – डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख संस्थापित श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य मा. श्री. अश्विन पोच्छी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री अश्विन पोच्छी सर होते तर प्रमुख अतिथी उपमुख्याद्यापिका अरुणा मार्डिकर मॅडम, पर्यवेक्षिका प्रज्ञा काळे मॅडम होत्या.

याप्रसंगी सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायतीचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला तसेच ‘देश मेरा रंगीला’ या गीतावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमात शिवाजी इंग्लिश आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


“कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार”
या नांदगाव कनिष्ठ महाविद्यालयातील चि. समर्थ रवींद्र डांगे ला वर्ग १० मध्ये ९३.८० % सर्वाधिक गुण, चि. प्रणय विलास काळे ला १२ वी विज्ञान शाखेत ८७.६३ % सर्वाधिक गुण, चि. प्रज्वल शंकर गायधने ला १२ वा वाणिज्य शाखेत ७६.६७ % सर्वाधिक गुण, कु. संजीवनी रमेशराव सोनोनेला १२ वी कला शाखेत ७५ % सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल या चारही गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले प्रतिष्ठान तर्फे माजी नगरसेवक कै. बाबारावजी बुंदेले यांच्या १५ ऑगस्टला असलेल्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन प्राचार्य श्री. अश्विन पोच्छी, उपमुख्याद्यापिका अरुणा मार्डिकर, पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा काळे व मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनी सत्कार केला.


“बारावी कला – वाणिज्य – विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राध्यापकांनी केला सत्कार”
कला शाखेच्या बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. अमित गावंडे, प्रा. सुबोध शिरसाठ, प्रा. सुनिता मोहोड, प्रा. अर्चना बेलसरे, प्रा. सरला पावडे यांनी स्पर्धा परीक्षेचा संच देऊन केला तर बारावी विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. स्वाती वाटाणे, प्रा. रोशन कपिले, प्रा. पुनम हरणे व प्रा. प्रतिक्षा कळमकर यांनी रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन केला. बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. प्रकाश डोंगरे, प्रा. विवेक कटके व प्रा. कृष्णा भोसले यांनी रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन केला.


“विषय शिक्षकांनी केला दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार”
दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सौ. प्रज्ञा काळे, भारती बडे, रुपाली साखरे, वैशाली गुडधे, संपदा देशमुख,अमोल ठाकरे, एस. एस. काळे व जगदीश गोवर्धन यांनी केला.


“मान्यवरांनी मनोगतातून दिल्या
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ॥”
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. अश्विन पोच्छी, प्रमुख अतिथी उपमुख्याद्यापिका अरुणा मार्डिकर, पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा काळे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मनोगतातून दिल्या तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरस्कारदाते प्रा. अरुण बुंदेले यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जगदीश गोवर्धन, संचलन प्रा. स्वाती वाटाणे तर आभार संपदा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. देशभक्ती, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी नटलेल्या या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने झाली.
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.






