श्रद्धा आणि अंधश्रद्धा.!

SHARE:

अंधश्रद्धेचा जन्म हा श्रद्धेतूनच होतो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात भावनेच्या आहारी जाऊन आपण श्रद्धेची मर्यादा ओलांडतो तेव्हा आपण अंधश्रद्धेच्या मार्गाने जाऊ लागतो आणि त्याचे विपरीत परिणाम निघायला सुरुवात होते.

 

आपण प्रेमापोटी अंधविश्वास करतो सारे कळूनही न कळल्यासारखे करतो. परंतू प्रेमालाही मर्यादा असतात ती मर्यादा आपण कधी कधी ओलांडून जातो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतो. तेव्हाही आपण चुकतो आपण आत्मचिंतन करण्या ऐवजी दुसर्‍याला दोष देण्यात मग्न असतो. त्यामुळे आपल्यातील अंधविश्वास दूर होण्यास ऐवजी तो वाढतच जातो.

श्रद्धा असावी पण त्याची मर्यादा ओळखावी. आपण आपल्या माणसीकतेला पुर्णपणे श्रद्धेत झोकून देणे हे चुकीचे ठरते. आज बुवाबाजी, बलात्कार, विश्वास घात हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्याचे कारण आपली माणसीकता आपण मर्यादेपेक्षा कशाची तरी गुलाम बनवतो त्याचाच फायदा धुर्त लोक घेतात आणि आपणच ओरडतो घात झाला म्हणून. जो मर्यादा ओळखून सामाजिक व्यवहार करतो त्यावर सहसा अशी वेळ येते नाही पण जो कोणत्याही वस्तुंच्या अती आहारी जातो त्यालाच वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते . श्रद्धा तर असावी त्याशिवाय पर्याय नाही श्रद्धेशिवाय माणूस माणूस म्हणून जगू शकत नाही पण श्रद्धेचे रुपांतर अंधश्रदेत होऊ नये एवढे मात्र कळले पाहिजे.

अंधश्रद्धा ही अफुच्या गोळीसारखी आहे. आपण काय करतो आहे योग्य की वाईट कळतच नाही. जेव्हा सत्य पुढे येते तेव्हा कधी कधी विचारांचे दरवाजे बंद होतात आणि माणूस हतबल होतो शेवटी टोकाचा निर्णय घेऊन स्वताच्या घात करुन बसतो.

म्हणून श्रद्धेला उंबरा असावा अंधश्रद्धेचा वारा न लागो माणसां.

लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९

 

संजय अण्णाजी देशमुख
Author: संजय अण्णाजी देशमुख

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..

Leave a Comment