‘बैलपोळा’ निमित्त विशेष कविता : एक अभिवादन

SHARE:

‘बैलपोळा’ निमित्य अभि. प्रफुल्ल ठाकरे यांची यांची विशेष कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत..

बैलपोळा.!!

ढवळ्या पवळ्याची जोडी
नामी दादा देखणी
जुळं भाऊ मुर्तीमंत जणू
उभं चंद्र सूर्य अंगणी

बाशिंग बांधलंंयं डोईवरी
शोभिवंत बेगड मणी
मानेवरलं पिवळं घुंगरू
वाजते किणकिणी

अंगावरचा पटृा पितवर्णी
शिंग चमके सोनेरी
पाठीवर पांघरली झूल
नक्षीदार जरीदारी

आजचा दिन भाग्यशाली
सण पोळा पिठोरी
डोक्यावर वहातोयं बेल
अन् फूलं पायावरी

प्रसाद घ्यावा पुरणपोळी
नतमस्तक तवं चरणी
अन्नधान्य केलं परिपूर्ण
जन्माचे आम्ही ऋणी

 

लेखक –
अभि. प्रफुल्ल ठाकरे
साहित्यिक तथा कवी,
अमरावती.

अभि. प्रफुल्ल ठाकरे
Author: अभि. प्रफुल्ल ठाकरे

लेखक अमरावती येथील रहिवासी असून अभियंता म्हणून सेवानिवृत्त आहे. सोबतच त्यांनी एम. ए. मराठी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केलेले आहे. वाचणाची व लिहीण्याची आवड त्यांनी जोपासली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक कथा, कविता, लेख लिहीलेले आहे. सर्वच विषयावर ते प्रभावी व मनभावन लेखन करतात. अनेक दिवाळी अंक व मासिकातून त्यांचे लेखन प्रसिध्द झालेले आहे, तसेच वृत्तपत्रातून सातत्यपूर्ण त्यांचे कथा कविता लेख इत्यादी साहित्य प्रसिद्ध होत असतात. सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात..

Leave a Comment

अधिक वाचा