सदगुरू वाचोनिया सापडेना सोय l धरावे ते पाय आधी ll

SHARE:

तुका म्हणे, शोभा सांगे…

गुरू प्रसादाची आवश्यकता
भक्ती मार्गात गुरू प्रसादाला फार महत्व आहे. अनेकांनी अगदी संतांसहित गुरुबाजीवर चांगलीच टीका केली आहे. गुरूंचा अगदी खरपूस समाचार घेतलेला आहे. पण तरीही गुरुप्रसादाची आवश्यकता मात्र वारंवार सांगितलेली आहे. नामस्मरणात देखील गुरुप्रसादाची आवश्यकता आहे. असे संत चरित्रावरून दिसून येते. गुरु प्रसादशिवाय नामयोगाचे रहस्य कळत नाही.

“प्राणी जातेंसी निष्ठरू l
स्थावरी बहुभरु ll”  
संत ज्ञानेश्वर असे सांगतात. धार्मिक श्रद्धा आणि नैतिक मूल्ये यांच्यामधील या विसंवादाची ज्ञानेश्वरांना जाणिव असल्यामुळे संजीव प्राण्यांना किंवा भावना असलेल्या माणसांना क्रुरपणे दाखवुन पाषाणाच्या देवाला भजणाऱ्या पण कशावरच एकनिष्ठ श्रद्धा नसलेल्या व दिखाऊ डामडौल करणाऱ्या भक्तबुवांचा त्यांनी उपहास केला.

खरी जातिवंत श्रद्धा मनात नसतानाही दररोज नव्या देवतांची पूजा करण्याचे नाटक करणाऱ्याला त्यांनी बाजार संबंधीची उपमा दिली आहे. उच्च तत्वज्ञानाचे अधिष्ठान नसले तर सर्व शास्त्रे आणि सर्व धार्मिक क्रिया मोराच्या पिसाऱ्यावरील द्रुष्टी नसलेल्या डोळ्याप्रमाणे निर्थक होत असे त्यांनी स्पष्ट पणे म्हटले आहे.

संत नामदेवांच्या उपदेशाची निर्मळ अशा भोळ्या भकतीभावाचा रंग आहे. त्यांनी ढोंग, खोटेपणा, दंभ, कपट, यांचा तितकाच तिटकारा व्यक्त केला आहे.
“आले वो संसार सोडवणे करा ! 
शरण जा उदारता पांडुरंगा !!”
असा साधाच उपदेश संत नामदेवांनी केला आहे, पण वासनेचे कीडे मनात बुजबुजत असताना शरणागतीचे ढोंग करून बळेच, हरिभक्त म्हणवून घेऊन, जे भाविकांना लुबाडण्याचा धंदा करीत असतात, त्यांचा तीव्र निषेध करून त्यांना खरा मार्ग दाखविला आहे व खरा परमार्थ बाह्य वेषावर अवलंबून नसून अंतरंग शुद्धी व हरीला सर्वभूती पाहून भूतमात्रावर दया करण्यात आहे. अशा प्रकारे नामदेवांनी ज्ञानी, योगी, भक्त, संत, महंत, गोसावी, वारकरी, रामानुज, माधव, इ. संप्रदायात जे जे खोटे व दांभिकपणा चे प्रकार त्यांना आढळले त्यांचा धिक्कार करून शुद्ध भक्ती भावाने देवाला मजा असे लोकांना कावळ्याने सांगितले आहे.

संत तुकाराम यांनी याच अर्थाने आपल्या अभंगातून स्पष्टपणे सांगितले आहे.
मुखे सांगे ब्रह्मज्ञान ! 
जन लोकांची कापितो मान !!
मुखाने ब्रह्मज्ञान आमच्या गप्पा मारत जन लोकांची मान कापणे, फसवणुक करणे तुकोबांना अत्यंत निंदनीय वाटते. स्वत:जवळ ज्ञानाचा अभाव असताना, कोणताही अनुभव नसताना लोकांना ज्ञान देण्याचा आभास करणे म्हणजे खोटेपणाच होय. लोभाने देवाची कथा सांगतो परंतु मनात लोभ असतो. अशांचे तर थोबाडीत फोडायला हवे. अशा प्रकारे बुवाबाजी करणाऱ्या दांभिक लोकांची सर्वच संतांनी निर्भत्सना केली आहे. कारण अशा लोकांपासून कोणतीही क्रृपा होऊ शकत नाही. कोणीही अशांना गुरू करू नये. अशांना संतक्रृपा किंवा गुरू कृपा काय असते हेही कळत नसते. नामयोगाचे रहस्यही कळत नाही. त्यासाठी आल्या गुरुच्या कृपा प्रसादाची आवश्यकता आहे.
नामदेव महाराज सांगतात,
“नामदेव म्हणे स्वतः सिद्ध नाम ! 
गुरूविण मर्म न ये हातात !!” 
म्हणजे नाम स्वयंसिद्ध असेल तरी गुरू शिवाय त्यांचे खरे मर्म कळणे शक्यच नाही.

त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणतात, 
सद्गुरू वाचोनिया सापडेना सोय ! 
धरावे ते पाय आधी !!
“गाढवा घरी पोथ्या उलथिशी पाने ! 
परी गुरू गम्य न कळे बापा !!” 
ही तुकारामांची अभंग वचनेही प्रसिद्ध आहेत.

ह्याचा अर्थ असा की, भक्ती आणि नाम भक्ती सोपी असली तरी तिच्यातही काहीतरी असे गुण रहस्य आहे की जे गुरू शिवाय उलगडत नाही. काही खास आणि गूढ गोष्टी गुरूकडून कळणे आवश्यक असते. केवळ बहिरंग नामस्मरणाने सांगत नाही. तर त्यात अंतरंग किंवा गुणांनी असावे. त्याशिवाय साधकांना सिद्ध होते शक्य नाही.

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्य अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा