दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून महाराष्ट्रात सामाजिक क्रांतीची नवी पहाट आणली. दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी असलेल्या सत्यशोधक समाजाच्या १५३ व्या वर्धापन दिनानिमित्त या सत्यशोधक समाजाच्या ध्येय आणि विचारांना वंदन करणारी साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
सत्यशोधक….
सत्याच्या शोधासाठी निघाला,
एक सत्यशोधक ।
तमाला भेदून गेला क्रांतीचा,
एक सत्य सत्यशोधक ॥
सत्यशोधक महात्मा फुलेंचा
विचार सत्यशोधक ।
अज्ञान-अंधार भेदून गेला,
फुलेंचा सत्यशोधक ॥
चोवीस सप्टेंबरची सोनेरी,
पहाट सत्यशोधक ।
समतेची नवी वाट देणारा,
फुलेंचा सत्यशोधक ॥
स्त्री – शूद्रांना विद्या देणारा,
समाज सत्यशोधक ।
अंधश्रद्धेच्या बेड्या तोडणारा,
फुलेंचा सत्यशोधक ॥
जाती-धर्मा पेक्षा माणूस श्रेष्ठ,
सांगणारा सत्यशोधक ।
विसरू नका सावित्री जोतीचे कार्य,
थोर सत्यशोधक ॥
वर्धापन दिनी वंदू द्वयांना,
करांनी प्रणाम ।
सत्यशोधक कार्याला करू या,
मनस्वी सलाम ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व अभंगकार, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






