नागपूर – आदिमाया आदिशक्ती दुर्गादेवीच्या उपासनीच्या दुर्गोत्सवाला लवकरच प्रारंभ होत आहे. दुर्गोस्तव मंडळाच्या तयारीला वेग आला असून यंदा दुर्गोत्सवात शहरातील विविध भागातील मंडळानी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून देवीचा जागर करावा असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कला, साहित्य, संस्कृती परंपरांचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी सन उत्सवांना ‘सांस्कृतिक’ रूप देण्याचा उपक्रम हाती घेतला. त्याला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून भाविकांना सांस्कृतिक मेजवानी देण्यात आली होती.
यावर्षी दुर्गोस्तवात नाट्यसंगीत, सुगम संगीत (भावगीत, भक्तीगीत, अभंग, देशभक्तीपर गीत, गीत रामायणावर आधारित निवडक गीते) भजन, कीर्तन, देशभक्तीपर नृत्य, गोंधळ, भारुड, नकला, एकल व समूह नृत्य, समूह वादन, कथाकथन, रांगोळी प्रशिक्षण, पारंपारिक खेळ, एकपात्री प्रयोग, कवी संमेलन (हिंदी व मराठी), लोकनृत्य, जादूचे प्रयोग, जागरण, दृकश्राव्य कार्यक्रम असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक मंडळांनी १ ते ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नावे नोंदवावी. या कार्यक्रमांच्या नोंदणीसाठी मा. श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, पहिला मजला, गडकरी वाडा, महाल, नागपूर येथे सकाळी १२ ते ५ या वेळेत संपर्क साधावा.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खासदार महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, डॉ. दीपक हिरवळकर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदिर, सारंग गडकरी, अविनाश भुसे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ॲड. नितीन तेलगोटे, मनीषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप कौर, शैलेश ढोबळे, संजय बंगाली, योगेश बन, राजू कनाटे यांचे सहकार्य लाभत आहे.

(पत्रकार परिषदेला महोत्सव समिती चे डॉ. गौरीशंकर पाराशर, प्रा. राजेश बागडी, अतुल गुरु, संजय बंगाली उपस्थित होते.)
सांस्कृतिक गणेशोत्सव ला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
५५० मंडळी ३७४० ढोल-ताशा वादक व ८०० कलाकारांचा सहभाग
गणेशोत्सवाच्या माध्यमातून कला संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक गणेशोत्सवाला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील तब्बल ५५० गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यात ५४ ढोल-ताशा पथकांमधील तब्बल ३७४० वादकांनी पारंपारिक वादन सादर करत गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत केला. याशिवाय सुमारे ८०० कलाकारांनी विविध कला सादर करून नागपूरकरांचे मनोरंजन केले.
यंदाच्या महोत्सव भक्तीसंगीत, सुगम संगीत, देशभक्तीपर गीते, हास्य कवीसंमेलन, जागरण, गोंधळ, कीर्तन, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री प्रयोग, नाट्यप्रयोग, नकला, गीतरामायण, जादूचे प्रयोग, रांगोळी व मेहंदी प्रशिक्षण वर्ग, कथाकथन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






