राष्ट्रपितांच्या जयंती निमित्य विशेष काव्यरचना…

SHARE:

राष्ट्रपिता महात्मा गांधीजीं यांच्या दि. २ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या १५७ व्या जयंतीनिमित्त साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची काव्यरचना वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

बापूचे सत्य तंत्र…

सत्याचा धरून हात ।
अहिंसेचा एक मंत्र ॥
इंग्रज सोडून गेले ।
गांधीजींचे सत्य तंत्र ॥ १ ॥

ग्राम ही जागृत केले ।
चेतना ही जागविली ॥
देशभक्तीची ही ज्योत
ग्रामोग्रामी पेटविली ॥ २ ॥

खादी धाग्याने विणला ।
स्वातंत्र्य देवीचा हार ॥
सत्याग्रह शस्त्रातून ।
अन्यायाचा प्रतिकार ॥ ३ ॥

दांडीच्या सत्याग्रहाने ।
देशाची रचली वाट ॥
‘छोडो भारत’चा नारा ।
क्रांतीची नवी पहाट ॥ ४ ॥

बापूंच्या बलिदानाने ।
भारत स्वतंत्र झाला ॥
पंधरा ऑगस्टला हा ।
देश आनंदात न्हाला ॥ ५ ॥

बापूच्या सत्य त्यागाला ।
करू करांनी सलाम ॥
राष्ट्रपित्याला करू या ।
कर द्वयांनी प्रणाम ॥ ६ ॥

 

लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी, अमरावती. 
संपर्क – ८०८७७४८६०९.

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा