नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘नागपूर सिटिझन्स फोरम’च्या वतीने व्हेरायटी चौक येथे गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा आणि वाहतूक जनजागृती करणारा एक अनोखा ‘गांधींगिरी’ उपक्रम राबविण्यात आला. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना महात्मा गांधींच्या वेषातील बालकाने गुलाबाचे फूल देऊन वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिली.


या वेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त (DCP) मा. आदित्य मिरखेलकर साहेब यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत असलेल्या अणय बांदुरकर या बाल सदस्याचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिले. चौकात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना अणयच्या हस्ते गुलाबाचे फूल देऊन शांततेच्या मार्गाने शिस्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले.


गांधीगिरीच्या तत्त्वाला धरून राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, उपस्थित नागरिकांकडून या कल्पक जनजागृतीचे विशेष कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी नागपूर सिटिझन्स फोरमचे रजत पडोळे, अमित बांदुरकर, रोहित कुंभारे, संजय भालमे, चेतन रामटेके, जयश्री गाडगे, नेहा डागोरिया यांच्यासह इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






