दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय: ९ आणि १० ऑक्टोबर रोजी सर्व मद्याची दुकाने राहणार बंद

SHARE:

दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली सरकारने कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राहण्यासाठी आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक कडक पाऊल उचलले आहे. दिल्ली आबकारी विभागाच्या आदेशानुसार, राजधानीत ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी मद्याची सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणते दुकानें असणार बंद –

आकारी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार, या दोन दिवसांच्या कालावधीत दिल्लीतील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांवर टाळेणार असणार आहे. यामध्ये खालील परवान्यांतर्गत येणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश आहे:

L6, L6FG, L8, L10, आणि L14 परवान्यांवर चालणाऱ्या सर्व किरकोळ दारूची दुकाने.
सरकारी तसेच खाजगी मालकीच्या सर्व मद्य विक्रीच्या दुकानांवर हा आदेश लागू राहील, म्हणजेच या दोन दिवसांत दिल्लीत कोणतीही कायदेशीर मद्य विक्री होणार नाही.
निर्णयामागील कारणे ?

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विविध विरोधी पक्ष आणि संघटनांकडून सुरू असलेली निदर्शने, तसेच काही गटांकडून प्रस्तावित असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त व सुरक्षेच्या अहवालानंतर, राजधानीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच सार्वजनिक शांतता कायम राहावी म्हणून हा प्रतिबंधात्मक निर्णय उपाय म्हणून लागू करण्यात आला आहे. संवेदनशील भागात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.

राजधानीत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चोख बंदोबस्त

आंदोलने आणि राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षेचे अतिशय कडक निर्णय घेण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात सुमारे २० हजारांहून अधिक पोलीस आणि अर्धसैनिक दलातील जवानांना तैनात करण्यात आले आहे. जंतरमंतर आणि इतर महत्त्वाच्या मार्गांवर तसेच संवेदनशील परिसरांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही नागरिकाला किंवा प्रवाशाला त्रास होणार नाही आणि वाहतूक सुरळीत चालू राहील.

प्रशासनाने दारू विक्रेते व नागरिकांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा