नागपुरात सीजेपी सदस्यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली व आंदोलन; “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, तो आमचा हक्क आहे” या संदेशाचा जागर 

SHARE:

नागपूर : कोकक्रोच जनता पार्टी (सीजेपी) च्या सदस्यांच्या वतीने नागपुरात तिरंगा रॅली व आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात सीजेपी सदस्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. भारतीय तिरंग्याचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संरक्षण, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा या प्रमुख मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आले.

“तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही, तो आमचा हक्क आहे!” हा या आंदोलनाचा मुख्य नारा होता. भारतीय तिरंगा हा देशाचा अभिमान असून, प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या चौकटीत राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचा अधिकार आहे, हा संदेश सीजेपी सदस्यांनी दिला. लोकमत चौक ते व्हेरायटी चौक तिरंगा ण्यात रॅली यावेळी काढण्यात आली त्यानंतर व्हेरायटी चौक येथे जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करून झाली तर समापन राष्ट्रगीताने करण्यात आले. 

आंदोलनादरम्यान तिरंगा हातात घेऊन लोकशाही अधिकार आणि संविधानिक मूल्यांप्रती बांधिलकी व्यक्त करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि नागरिकांच्या आवाजाला योग्य स्थान मिळावे, अशी मागणी आंदोलकांनी मांडली. 

या आंदोलनाच्या माध्यमातून सीजेपी सदस्यांनी एकजुटीचा संदेश देत नागरिकांना लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.

या आंदोलनात दुर्गेश कुहिके, तेजस धर्माळे, सुरभी कलरिया, पायल लोकारे, स्वरूप मेश्राम, वैदेही भेलावे, भूमिका चौहान, अक्षय डकरे, यश चौधरी, विभांशू बन्सोड, शुभम बिंजोडे, आकाश सिरसाट, अमन खान, चेतन फुलमाडी, मयूर आटे आणि मिथुन पिल्लेवान यांच्या सह शेकडो नागरिक एकत्र सहभागी झाले होते.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा