पाणीटंचाई व दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने क्षेत्रीय पाहणी व आढावा बैठक..

SHARE:

नागपूर : आज दि. ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कामठी अंतर्गत ग्रामपंचायत कवठा, म्हसाळा व खसाळा येथे पाणीटंचाई व संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी करून आढावा बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीस कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कामठी, उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, कामठी व लघु पाटबंधारे उपविभाग, हिंगणा, उप अभियंता, यांत्रिकी, सहाय्यक भूवैज्ञानिक व  संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायत कवठा :

ग्रामपंचायत कवठा येथे पाणीटंचाई निवारणासाठी खालील उपाययोजनांचा टंचाई आराखड्यामध्ये समावेश करण्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्देश दिले.

– विहीरीजवळ भूमिगत बंधाऱ्याचे बांधकाम करणे.

– 5 पुनर्भरण शाफ्ट (Recharge Shafts) बांधणे.

– 2 नवीन विंधन विहिरी घेऊन त्यासाठी पंपिंग यंत्रणा व राइजिंग मेनची व्यवस्था करणे.

– अस्तित्वातील 10 विंधन विहिरींचे फ्लशिंग.

– नाला खोलीकरन व सिमेंट नाला बंधारा

ग्रामपंचायत खसाळा 

– दत्त मंदिर येथील विहिरीतील गाळ काढून विहिरीची स्वच्छता व पुनरुज्जीवन करणे.

– सदर परिसरात 1 नवीन विंधन विहीर घेणे.

– बाजार ओट्याजवळील विहिरीतील गाळ काढून स्वच्छता करणे व विहिरीचे पुनरुज्जीवन करणे.

– 2 नवीन विंधन विहिरी घेऊन त्यासाठी आवश्यक पंपिंग यंत्रणा व राइजिंग मेनची कामे टप्पा-2 मध्ये समाविष्ट करणे.

– महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) मार्फत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनवरील एअर व्हॉल्व्हमधील गळतीची तातडीने दुरुस्ती करणे.

आगामी उन्हाळ्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, उपलब्ध जलस्रोतांचे व्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, पाण्याची बचत व पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था यावर भर देऊन सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांना निर्देश दिले.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा