
आजचे शेअर बाजार : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा मूड बिघडण्याचे सध्या संकेत मिळत आहेत. गुरुवारी अमेरिकन बाजारांमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. दिवसाच्या ट्रेडिंगदरम्यान बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह ट्रेंड करत असताना दिवसाच्या शेवटी अख्खा खेळ बदलला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजने (DJIA) ४०० अंकांनी घसरून दिवसाच्या सर्वात नीचांकावर क्लोजिंग केली. तर नॅसडॅक २ % पेक्षा जास्त घसरला आणि S&P500 देखील 0.८ % खाली आला.
शेअर बाजारासाठी नकारात्मक संकेत
शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी, जागतिक बाजारातील प्रचंड अस्थिरता, AI स्टॉक्समधील विक्रीचा सपाटा आणि अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांच्या भावना मंदावल्या असतानाच देशांतर्गत बाजाराच्या हालचालीवर लोकांची बारीक नजर असेल. मात्र जागतिक बाजारातील गोंधळात देशांतर्गत बाजार पुन्हा तेजीच्या वाटेवर पुढे सरकेल की घसरेल याकडे लोकांचे लक्ष लागून असेल जागतिक बाजारावर दबाव पाहायला मिळत आहे पण, FII आणि DII खरेदीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे. आदल्या दिवशी, गुरुवारी, सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी ऑल-टाइम उच्चांकाजवळ क्लोज होऊन गुंतवणूकदारांची अशा वाढवल्या.
गुरुवारी अमेरिकन बाजाराची सुरुवात धमाकेदार झाली असली तरी शेवट विनाशकारी ठरला. सगळं सुरळीत सुरु असताना वॉल स्ट्रीटवर अचानक मोठ्या प्रमाणात विक्री झाली, ज्यामुळे तिन्ही प्रमुख निर्देशांक दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरले. व्यवहाराच्या शेवटच्या तासात झालेल्या उलटफेरीने गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले.
अमेरिकन बाजारात गोंधळ, एआय स्टॉक्समुळे तणाव वाढला
बुधवारी अमेरिकन बाजारांमध्ये लक्षणीय घसरण दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी दिवसाच्या १ ,१०० अंकांनी घसरल्यावर दिवसाच्या शेवटी किंचित सावरून ४०० अंकांनी खाली क्लोज झाला. याशिवाय आयटी कंपन्यांचा नॅसडॅक शिखरावरून ५०० अंकांनी खाली बंद झाला आणि दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आपटला.
AI स्टॉक्समधील प्रचंड विक्रीमुळे भावना आणखी बिकट झाली. मजबूत निकाल दिल्यानंतर मजबूत सुरुवात करणाऱ्या Nvidia शेअर दिवसाच्या उच्चांकावरून ट्रेडिंगमध्ये ८ % घसरला आणि शेवटी ३ % घसरून क्लोज झाला. मजबूत रोजगार आकडेवारीमुळे चिंता निर्माण झाली आहे की फेड लवकरच दर कमी करणार नाही, ज्यामुळे टेक स्टॉक्सवर दबाव निर्माण झाला आहे.





