राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडणार? अजित पवारांचे संकेत, म्हणाले कि…

SHARE:

धाराशिव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाने निवडणूक लांबण्याची शक्यता अजित पवारांनी धाराशिव येथे बोलताना व्यक्त केलीय.

कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते..

जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वकिलांनी ही माहिती दिल्याचे अजित पवारांनी सांगितलं. कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते, असं अजित पवार म्हणाले. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणूक विविध कारणामुळे लांबणीवर पडली. जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार यासाठी अनेक इच्छुक वेटिंगवर आहेत. मात्र पुन्हा एकदा निवडणूक लांबन्याची शक्यता वर्तवली जात असताना अजित पवारांनी यावर भाष्य करत हि माहिती दिलीय. राज्यातील २४६  नगरपालिका आणि ४२  नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २  डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३  डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा