
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज ६ डिसेंबर २०२५ , आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनि महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या नवीन योजना आजूबाजूच्या लोकांना पसंत पडतील, त्यामुळे तुमचे फायद्याचे प्रमाण वाढेल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिला बौद्धिक क्षेत्रात काही नावीन्यपूर्ण काम करतील, कौटुंबिक स्तरावर थोडे भावनिक संघर्ष अनुभवास येतील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये नको त्या व्यक्तीसाठी पैसा खर्च करावा लागल्यामुळे चिडचिडे बनाल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या, त्यांच्याकडून अपेक्षाभंगाचे दुःख पत्रात पडण्याची शक्यता.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांनो आज हातचे सोडून पळत्याच्या मागे लागल्यास तो हाताला काहीच लागणार नाही.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज वडिलांच्या तब्येतीस जपावी लागेल, त्यासाठी पैसाही खर्च होण्याची शक्यता.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज शेजाऱ्यांच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास होईल, संतती आणि तुमच्या विचारांमध्ये तफावत राहील.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो अति महत्त्वाकांक्षामुळे चंचल बनाल, अस्थिर मनवृत्तीमुळे जवळच्या लोकांशी वाद संभवतात.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज महिलांना जुन्या परंपरांचा तितकारा येईल, मनाच्या कल्पना तीव्र होतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज राजकारण, समाजकारण आणि लोकोपयोगी कामे करणं आज खूप आवडेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज जे ठरवाल ते करून दाखवाल, त्यामुळे तुमचा रुबाब वाढेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज योग्य व्यक्तींशी संवाद साधला, त्यातून तुम्हाला फायदा होईल.





