शासकीय ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी, १० लाखांची खंडणी; बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाविरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल…

SHARE:

भंडारा : पत्नी आणि मुलाच्या मृत्यूस वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत विवेक शहरे यांनी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयासमोर मागील महिन्यात आमरण उपोषण केलं. हे उपोषण सोडवून देण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र देशपांडे यांचा वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ठाकरे यांच्याशी वाद झाला. या वादात जयेंद्र देशपांडे यांनी डॉ.ठाकरे यांना ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी देत त्यांना शिवीगाळ केली. यानंतर वारंवार फोन करून डॉक्टरला त्यांच्या मित्राच्या माध्यमातून हे प्रकरण थांबविण्यासाठी १०  लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप डॉक्टर ठाकरे यांनी केलाय.

ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी देत त्यांना शिवीगाळ

या गंभीर प्रकरणाची तक्रार डॉ. ठाकरे यांनी केली होती. पोलिसांनी तपासानंतर या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या जयेंद्र देशपांडे यांच्या विरोधात कलम ३०८ (२ ), १३२ ,२९६ , ३५२ , ३५६ ,३५१(२) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास लाखांदूर ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गद्रे करीत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा