राज्यात रेस्क्यू सेंटर्स उभारा, बिबट्याच्या हल्ल्यांना ’राज्य आपत्ती’ घोषित करा – आमदार शरद सोनावणे

SHARE:

नागपूर – राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी रेस्क्यू सेंटर्स उभारण्याची गरज आहे ,तर राज्यातील बिबट्याच्या हल्ल्यांना ’राज्य आपत्ती’ घोषित करा अशी मागणी आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे. महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा प्रश्न गंभीर प्रश्न बनला आहे, तर नागपूर अधिवेशनात आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्याच्या हल्ल्यांना ’राज्य आपत्ती’ घोषित करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीवर, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यात आले आहे. आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभा परिसरातच ‘बिबट्याच्या वेशात’ कपडे परिधान करत दाखल होऊन या बिबटयाच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही घटना अधिवेशनातील प्रमुख आकर्षण ठरली आणि राजकीय व सामाजिक चर्चेचा विषय बनली. आमदार शरद सोनवणे यांनी या प्रश्नाची तीव्रता सभागृहासमोर मांडून राज्यातील सरकारला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची भयावह आकडेवारी आणि भीतीचे वातावरण आहे, असे आमदार सोनावणे यांनी म्हटले आहे. आमदार सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या ९  ते १०  हजारांपर्यंत पोहोचली आहे. या बिबटयांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील मनुष्य-प्राणी असा संघर्ष वाढला आहे. राज्यातील पुणे जिल्हयात एकट्या जुन्नर तालुक्यात गेल्या 3 महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये 55 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले अंगणात खेळायलाही धजावत नाहीत. शेतकरी शेतीत काम करण्यासाठी कचरत आहेत, ज्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे.
राज्यातील सरकारने राज्य आपत्ती’ घोषित करण्याची आणि तातडीने रेस्क्यू सेंटर्स उभारण्याची मागणी आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे. राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ,आमदार सोनवणे यांनी राज्यातील सरकारकडे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. राज्यातील बिबट्याच्या हल्ल्यांना ’राज्य आपत्ती’ घोषित करून, मुख्यमंत्र्यांनी यावर ’सु-मोटो’ निर्णय घ्यावा. सध्याचे राज्यातील सरकारचे उपाय निरुपयोगी ठरत असल्याने, बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी तातडीने केंद्रे उभारण्याची गरज आहे. जुन्नर आणि अहिल्यानगर अहमदनगर येथे प्रत्येकी १  हजार बिबटे ठेवता येतील, अशा क्षमतेची दोन रेस्क्यू सेंटर्स 3 महिन्यांच्या आत उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्यातील बिबटयांच्या हल्ल्याच्या घटनांवर राज्यातील विधानपरिषदेतही गंभीर चर्चा झाली आहे. नागपुरात जिथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तिथेही बिबट्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधानपरिषदेत या विषयावर माहिती दिली आहे. आज नागपूरात बिबट्या आढळला आहे, त्याबद्दल माहिती घेतली आहे. कालदेखील खालच्या सभागृहात बिबटयांच्या हल्ल्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. आज विदर्भातील आमदारांची बैठक लावण्यात आली आहे. यामध्ये आणखी सविस्तर चर्चा केली जाईल.“असे आमदार शरद सोनावणे म्हणाले आहेत. व राज्यातील सरकारला बिबटयाच्या समस्येवर लवकर तोडगा काढण्याची मागणी आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा