
संगमनेर – तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मूलाचा मृत्यू झाला आहे, तर वन विभागाने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढले आहेत. संगमनेर मध्ये डोळयांदेखत ४ वर्षीय मूलाला बिबट्यानं उचलून नेऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. सिद्धेशचा मृतदेह पाहताच संपूर्ण गाव शांत झाले. घराच्या दारात उभा असलेल्या चार वर्षीय सिद्धेश कडलग या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला होता.
अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. घराच्या दारात उभा असलेल्या चार वर्षीय सिद्धेश कडलग या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बालकाला जागेवरच उचलून ठार केले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. वन विभागाने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढल्यानंतर, चिमुकल्याचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला आहे. यावेळी नातवाचा मृतदेह बघून आजीने अश्रू थांबले नाहीत.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मूलाचा मृत्यू झाल्यामूळे गावावर शोककळा पसरली आहे. वन विभागाचे बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. चार वर्षीय मुलगा सिध्देशची आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षाचा चिमुकला सिद्धेश कडलग हा घराच्या दारात उभा होता. सिद्धेश एकटा असल्याचे पाहून गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याला जागेवरच ठार केले. चार वर्षीय मुलाला बिबट्याने ठार केल्याने संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते.
नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नरभक्षक बिबट्याला ठार मारेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाइकांसह ग्रामस्थांनी निर्णय घेतला होता. घटना घडताच वनविभागाकडून बिबट्याला शोधण्यासाठी रात्रभर शोध मोहीम सुरू होती. परिसरात अनेक बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. बिबट्याला ठार करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संताप ग्रामस्थांनी घेतली होती. यानंतर नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कुटुंबीयांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला. चिमुकल्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करताना कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण जवळे कडलग गाव शांत झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू असून बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहेत. तर पुण्यातील जुन्नरमध्ये आत्तापर्यंत ६८ बिबटे पकडले आहेत.





