
नवी दिल्ली – देशात सत्ता विरुद्ध सत्याची लढाई सुरू आहे, तर आरएसएस-भाजपला सत्तेतून हाकलण्याची गरज आहे,असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजपावर टीका केली आहे. देशातील निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
देशात निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात काँग्रेसपक्षाकडून मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून व्होट चोरीच्या मुद्द्यावरून काल १४ डिसेंबर २०२५ रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग , गृहमंत्री अमित शाह आणि मोदींवर टीका केली आहे. देशातील भाजपा सरकार सत्तेतून हाकलण्याची गरज आहे, असे गांधी म्हणाले आहेत.
देशातील मत चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी गृह मंत्री अमित शहा व भाजपा सरकारवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. माझ्या प्रश्नांची उत्तरे देशातील भाजपा सरकारकडे नव्हती. म्हणूनच अमित शाह संसदेत थरथर कापत होते. ते म्हणाले की, देशात सध्या सुरू असलेली लढाई ही सत्ता विरुद्ध सत्याची आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे सत्य आहे. सत्याच्या बाजूने उभे राहून आपण नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएस भाजपला सत्तेवरून हाकलुन देऊ, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. देशाच्या विविध भागातील लोक भाजपा सरकार विरोधातील लढाईत सामील होत आहेत. हीच देशातील लोकशाहीची खरी ताकद आहे, असे गांधी म्हणाले आहेत.
देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था उरलेली नाही. तर देशातील या सस्था भाजपा सरकार जे सांगेल ते काम करत आहेत, आणि या देशात चुकीच्या पध्दतीने निवडणुका लढवुन सत्तेवर येत आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये जनतेच्या मतांची वोटचोरी करून हे भाजपा सरकार लोकशाहीशी धोका करत आहे, देशातील सर्वसामान्य जनतेचा मतांचा गैरवापर करत आहेत, मतचोरी करून करून हे भाजपा सरकार देशात सत्तेवर आलेले आहे. या भाजपा सरकारला सत्तेतून हाकलण्याची गरज आहे ,असे राहूल गांधी म्हणाले आहेत.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था म्हणून काम करत नाही. तर देशातील भाजपा सरकारशी संगनमत करून निर्णय घेतले जात आहेत. त्यांनी अनेक निवडणूक आयुक्तांची नावे घेतली आणि म्हटले की हे सर्व सत्य दाबत आहेत.
देशातील निवडणुक आयुक्त ,तुम्ही भारताचे निवडणूक आयुक्त आहात, नरेंद्र मोदींचे नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनीही देशातील नवीन कामगार कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी ते म्हणाले, देशातील “नवीन कामगार कायद्यात असे म्हटले आहे की, देशातील निवडणूक आयुक्त काहीही करत असले तरी, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.“ ते म्हणाले की जर काँग्रेस सत्तेत आली तर, देशातील भाजपा सरकारने लागु केलेला कायदा बदलण्यात येतील. देशातील निवडणूक आयोग अधिकाऱी यांना जबाबदार धरले जाईल. राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही भारताचे निवडणूक आयुक्त आज आहात ,या देशात सरकार बदलल्यावर तुमच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल , हे लक्षात ठेवा. देशात आरएसएस भाजपा सरकारची विचारसरणी उलट आहे. देशात फक्त सत्ता आणि अधिकारासाठी भाजपा व आरएसएस मतांचा गैरवापर करत आहेत. आणि सत्तेच्या जोरावर विरोधी पक्षांतील लोकांना जेलमध्ये टाकत आहेत.
यावेळी राहुल गांधींनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत व भाजपा सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की आज देशात खरा संघर्ष सत्य आणि असत्य यांच्यात आहे. “माझे भाषण आधीच नियोजित होते, परंतु वाटेत मला कळले की, मोहन भागवत यांनी अंदमान आणि निकोबारमध्ये एक विधान केले होते. त्यांचे विधान ऐकल्यानंतर मी माझे संपूर्ण भाषण बदलले आहे. देशातील भारतीय संस्कृती आणि सर्व धर्मांचा पाया सत्यावर आहे.“ राहुल गांधी म्हणाले की, सत्य हे सर्वोच्च मूल्य आहे. परंतु आरएसएसची विचारसरणी उलट आहे. मोहन भागवत आणि आरएसएस भाजपा पक्षांच्या विचारसरणीत सत्याला महत्त्व नाही. तिथे फक्त सत्ता आणि अधिकारासाठी देशात हे काही करू शकतात. त्यासाठी देशातील आरएसएस भाजपा सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी आमची सत्याची लढाई सूरू आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहे.





