लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन पर अभंग…

SHARE:

लोकशाहीर – साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या
दि.१८ जुलै २०२६ ला असलेल्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावाजी बुंदेले यांचा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

लोकशाहीर –

स्मरतात आज ।
थोर साहित्यिक ।।
कीर्ती जागतिक ।
अण्णाभाऊ ।।१।।

अण्णाभाऊ साठे ।
साहित्य अक्षर ।।
समता विचार ।
लेखनीचा ।।२।।

प्रेरणेचे स्थान ।
कष्टकरी प्रजा ।।
कामगार राजा ।
दूरद्रष्टा ।।३।।

लावियले नाही ।
पाख कल्पितांचे ।।
भान वास्तवाचे ।
साहित्यात ।।४।।

समता नि न्याय ।
ज्योत संघर्षाची ।।
लेखनी भाऊंची ।
फकिरात ।।५।।

साहित्य सम्राट ।
वास्तवाची धार ।।
लेखनीने वार ।
दंभावर ।।६।।

अण्णाभाऊंना मी ।
करितो नमन ।।
करांनी वंदन ।
कोटी कोटी ।।७।।

 

लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे राज्यस्तरीय उत्कृष्ट
साहित्यिक पुरस्कार प्राप्त
अभंगकार व साहित्यिक, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
(प्रा. अरुण बुंदेले यांच्या ‘अभंग तरंग’ या काव्यसंग्रहातून साभार)

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा