
मुंबई – राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे वेध महाराष्ट्राला लागले असतानाच आता निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. तब्बल ९ वर्षानंतर महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजत असल्याने राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांनाही याची उत्सुकता होती. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे.
निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा करताच आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात पहिल्यांदा संपूर्ण महापालिका निवडणूक एकसोबत होणार आहे.
मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी ३ ते ५ उमेदवारांना मतदान करावं लागणार
“मुंबई महापालिकेत प्रभागात एक सदस्यीय प्रभाग आहे. मुंबई महापालिकेसाठी प्रत्येक मतदाराला केवळ १ मत द्यावं लागेल. तर २८ महापालिका या बहु सदस्यीय आहेत. बहुतांश महापालिकेत एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या महापालिकेत काही प्रभाग असेल आहेत की, जिथे ३ उमेदवार असतील तर काही प्रभागात 5 उमेदवार असतील. त्यामुळे या २८ महापालिकांमध्ये मतदारांना साधारणपणे ३ ते ५ मते द्यावे लागतील”, अशी महत्त्वाची माहिती देखील त्यांनी दिली.
निवडणुकांचा कार्यक्रम कसा असेल?
“२९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी ३१ डिसेंबर २०२५ ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही २ जानेवारी २०२६ अशी असणार आहे. तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ ला होईल. या महापालिकांसाठी मतदान १५ जानेवारी ला होईल. तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी होईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
कोणकोणत्या पालिकांमध्ये निवडणूक होणार?
मुंबई MMRDA विभाग :
१. बृहन्मुंबई – २२७
२. नवी मुंबई -१११
३. ठाणे – १३१
४. कल्याण-डोंबिवली – १२२
५ . वसई-विरार – ११५
६. भिवंडी-निजामपूर – ९०
७. मीरा-भाईंदर – ९६
८. उल्हासनगर – ७८
९. पनवेल – ७८
पश्चिम महाराष्ट्र विभाग :
१०. पुणे – १६२
११. पिंपरी-चिंचवड – १२८
१२. कोल्हापूर – ९२
१३. सोलापूर – ११३
१४. इचलकरंजी – ७६
उत्तर महाराष्ट्र विभाग :
१५. नाशिक – १२२
१६. अहिल्यानगर – ६८
१७. धुळे – ७४
१८. जळगाव – ७५
१९. मालेगाव – ८४
मराठवाडा विभाग :
२०. छत्रपती संभाजी नगर – ११३
२१. लातूर – ७०
२२. नांदेड-वाघाडा – ८१
२३. परभणी – ६५
२४. जालना – ६५
विदर्भ विभाग :
२५ . नागपूर -१५१
२६ . अकोला – ८०
२७ . अमरावती – ८७
२८. चंद्रपूर – ६६





