
नाशिक – नाशिकमध्ये, धर्माच्या नावाखाली हजारो झाडे कापण्याचा डाव आहे ,तर २५ हजार कोटी कुंभमेळयासाठी निधी कशाला? त्यात देशात किती शाळा आणि हॉस्पिटल तयार होतील, असे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. राज्यात कुंभमेळयासाठी २५ हजार कोटी रुपये दिले आहेत, उत्सव आहे, पण एवढा निधी कशाला? इम्तियाज जलीलांचा नाशिकमधून राज्यातील भाजपा सरकारला प्रश्न केला आहे. राज्यात नाशिक जिल्हयातील तपोवनात हजारो झाडे कापले जात आहेत. धर्माच्या नावाखाली हजारो झाडे कापली जात आहेत, असा आरोप इम्तियाज जलील यांनी राज्यातील भाजपा सरकारवर केला आहे.
एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी राज्यातील भाजपा सरकारवर नाशिकच्या झाडे तोडण्यावरून जोरदार केली आहे. काँग्रेसवाले म्हणाले हैदराबादवरून ओवैसी येत आहेत. त्यांनी काँग्रेससह सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एमआयएमची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
इम्तियाज जलील म्हणाले की, मी इथे मोटार सायकलवर पोहचलो आहे. नाशिकच्या तपोवनात धर्माच्या नावाखाली हजारो झाडे कापली जात आहेत. मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जमीन दिली होती. या राज्यात काही लोक होते जे सर्व धर्म आणि समाजासोबत चालत होते. यात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे होते. श्रद्धांजली द्यायची असेल तर, हॉस्पिटल किंवा शाळा बनवा, स्मारक नाही. भाजपच्या नेत्याचे जे स्मारक बनवले जात होते. मी त्या विरोधात कोर्टात गेलो, ज्या ठिकाणी स्मारक होत आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवा असे सांगितले. ज्या ठिकाणी भाजप नेत्याचे स्मारक बनत होते, आता त्या ठिकाणी चारशे बेडचे हॉस्पिटल आहे. हा देश सर्व धर्म समभावाचा आहे. जे २५ हजार कोटी रुपये देत आहे. त्यात देशात किती शाळा आणि हॉस्पिटल होतील, असे म्हणत त्यांनी कुंभमेळयाच्या निधीवरून राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली आहे.
ज्या शब्दात बोलणार, त्या शब्दात उत्तर देणारा मी आहे. इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, आपल्याला शिक्षणावर लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला लक्ष्य केले जात आहे. रोज दर्गा, मशिदी लक्ष्य केल्या जात आहेत. रोज एकाचे घर कुठल्या न कुठल्या राज्यात पाडले जात आहे. या देशात आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. भाजपाने ठरवले आहे की, आपल्याला यांच्याशी काही घेणे देणे नाही. रोज एक मंत्री आपल्या धर्मावर टोपी आणि दाढीवर बोलत आहे. १९४७ मध्ये आपल्या पूर्वजांना विचारले कुठे जाणार? आपण इथे जन्मलो असे सांगितले. कोणी काही बोलले तर, आपल्याला ऐकावे लागत आहे. आपण एवढ्या वर्षापासून ऐकत आहे. पण, आता ज्या शब्दात बोलणार त्या शब्दात उत्तर देणार, असा इशारा त्यांनी राज्यातील भाजपा सरकारला दिला आहे.
राज्यात लोढा नावाचा एक मंत्री आहे. त्याचा एक फ्लॅट करोडमध्ये जातो. त्याने वक्तव्य केले, ज्यांना कोणाला कुराण वाचायचे असेल तर, त्यांनी पाकिस्तानमध्ये जा. ज्या दिवशी त्याने वक्तव्य केले, त्या दिवशी त्याचा बाप बिहारमध्ये प्रचार करत होता. त्याच दिवशी त्याला उत्तर दिले असते. एक दिवशी मी कोल्हापूर, दुसऱया दिवशी अहिल्यानगरला जाणार आहे. मी कोणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा नाही. मी पार्लमेंटमध्ये उभा राहतो तर, इथे बोलणारच ना. इथे नाशिकमध्ये पहिल्यांदा आलोय. इथून पुढे येत राहील. पुढच्या वेळी इथे हेलिकॅप्टरमध्ये येईल, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
इम्तियाज जलील पुढे म्हणाले की, मनपा निवडणूक आहे. इम्तियाज जलील लोकसभा, विधानसभा हरला ,पण यांच्यात हरवण्याची ताकद नव्हती. आपल्याच गद्दारांनी आपल्याला पाडले. आता तर उद्धव ठाकरेंना पण, सेक्युलर नेता मानत आहे. पण, याच देशात भाजपाच्या राजकीय लोकांनी ६ डिसेंबरला जल्लोष केला, त्या दिवशी त्यांनी सांगितले आम्ही बाबरी पाडली. काही मुस्लिम भाजपमध्ये आहेत. एकनाथ शिंदे सोबत आहे. हेच एकनाथ शिंदे जे आपल्या श्रध्दास्थानावर बोलले. रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे सिन्नर येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, यावरून एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
राज्यात रोज आपल्यावर भाजपावाले बोलत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. आपण काही बोललो तर कारवाई होते. दलित, आदिवासी समाजाचे अनेक जण जेलमध्ये आहेत. मुंबई आणि राज्यातील निवडणुका सुरू होत्या. ते हे एकत्र होते. पण, त्यात भाजपचा मुंबई अध्यक्ष म्हणत होता की, नवाब मलिकला सोबत घेणार नाही. मी फडणवीस ईना यांचे, एकनाथ शिंदे यांचे मीना, अजित पवार यांचे डीका नाव ठेवले आहे. अजित पवार यांना मतदान म्हणजे भाजपला मतदान, असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी भाजपा सरकारमधील तीनही पक्षांवर केला आहे.





