बारामतीच्या मुलींवर बीडमध्ये बलात्काराची घटना, चौघांवर गुन्हा दाखल…

SHARE:

अंबाजोगाई – बारामतीच्या मुलींवर बीडमध्ये बलात्काराची घटना घडली आहे, तर या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामतीच्या मूलीला कलाकेंद्रात कामाचे व पैशांचं आमिष दाखवले आणि फसवले आहे. बारामतीच्या मुलीला बीडमध्ये आणून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला आहे. या घटनेचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत. बीडच्या अंबाजोगाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून, तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला असून, या घटनेचा तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आमिष बदामबाईने दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र मुलीला अंबाजोगाई येथील ’पायल कलाकेंद्र’ येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील लॉजवर नेण्यात आले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कलाकेंद्र येथे आणून सोडण्यात आले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला आहे.

आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आहे. अत्याचारानंतर पीडितेने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आरोपींचा शोध पोलीस करत आहेत. राज्यात कामाच्या बहाण्याने मूलीला फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर राज्यातील सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील ग्रामीण भागात मूलींवर अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा