पुण्यातील विमान सेवा ३१ डिसेंबरपर्यंत रद्द , विमान वाहतूक प्रशासनाचे आदेश…

SHARE:

पुणे – पुण्यातील विमान सेवा ३१  डिसेंबर २०२५  पर्यंत रद्द करण्यात आलेली आहे, तर विमान वाहतूक प्रशासनाने तसे आदेश दिले आहेत. पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा ३१  डिसेंबर २०२५ पर्यंत रद्द केली आहे. तर डीजीसीएच्या अधिकाऱी वर्गानी तसे आदेश दिले आहेत.

धुक्यामुळे विमान उड्डाणामध्ये व्यत्यय आल्यास, विमानांना विलंब होत असल्यास विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रवाशांना विश्वासात घेऊन वेळोवेळी अचूक माहिती द्यावी, असे निर्देश विमान वाहतूक महासंचालनालयाच्या डीजीसीए अधिकारयांनी दिले आहेत
भारतातील विमानतळांवर धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय येत आहे. त्या पार्श्वभूमीवर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर भेट देऊन तयारीची पाहणी केली आहे. तत्पूर्वी, पुणे विमानतळ प्रशासन, सीआयएसएफ, सर्व विमान कंपन्या आणि स्थानिक पातळीवर नियोजन करणाऱया संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत समन्वय बैठक घेतली आहे. यावेळी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी टर्मिनलवर असलेल्या सुविधा, माहिती प्रसारण यंत्रणा, विमान कंपन्यांच्या खिडक्या, स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन आणि हस्तक्षेप याबाबत सुरक्षित मानकांची, तसेच प्रमुख प्रवासी संपर्क बिंदूंची तपासणी केली आहे.

धुक्यामुळे उद्भवू शकणाऱ्या व्यत्ययांसाठी तयारीचे मूल्यमापनही या वेळी करण्यात आले आहे. त्यानंतर डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली आहे. वेळापत्रकानुसार विमानांच्या उड्डाणांना विलंब झाल्यास विमानतळावर गर्दी वाढत जाते. प्रवाशांना वेळोवेळी माहिती मिळाली नाही, तर अविश्वास निर्माण होतो. विमानतळ व्यवस्थापनावर ताण पडतो. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांशी संवाद सुरू ठेवावा, असे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. या सूचनांची अमंलबजावणी केली नाही, तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत धुक्यामुळे ६० विमानांना फटका बसला. त्यामुळे दिल्लीतून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना दीर्घ काळ अडकून बसावे लागले. इतर विमानतळांवरही अशीच परिस्थिती असली तरी हवाई उड्डाणामध्ये व्यत्यय येत असल्याने विमानांची सेवा रद्द करण्यात आलीj आहे.

विमानाला उशीर झाल्यास किंवा रद्द झाल्यास विमान कंपनी प्रवाशांना काही सुविधा पुरवते. या सुविधांची माहिती प्रवाशांना वेळोवेळी देणे. विमानाचे उड्डाण रद्द झाल्यास कंपनी प्रवाशाला पर्यायी विमानाचा पर्याय द्यावी, किंवा तिकिटाचे शुल्क माघारी द्यावे. परताव्याच्या व्यतिरिक्त नुकसान भरपाई देणे. विलंबीत सेवेदरम्यान प्रवाशांना अल्पोपहार, पाणी, जेवण, औषधे पुरविणे हे महत्वाचे आहे.

विमानसेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. इंडिगो विमान समूहाने तांत्रिक कारणास्तव पुणे आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा ३१  डिसेंबर २०२५  पर्यंत रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये पुणे विमानतळावरून जानाऱ्या-येणाऱ्या विमानांचा समावेश आहे, अशी माहिती इंडिगो समूहाकडून सोमवारी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पुणे विमानतळावरून तात्पुरत्या रद्द झालेल्या विमानांमध्ये वाराणसी-पुणे-वाराणसी, बेंगळुरू-पुणे-बेंगळुरू, गुवाहाटी-पुणे आणि पुणे चेन्नई ही या मार्गावरील विमानसेवेचा समावेश आहे. ज्या प्रवाशांनी या कालावधीदरम्यान आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांना रकमेची परतफेड मिळेल अथवा पुन्हा आरक्षणासाठी पुढील तारखेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी इंडिगो समूहाच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती पाठवावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा