
अमरावती – जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर झाला आहे. दहा नगरपरिषदांपैकी सात ठिकाणी महिला तर दोन पैकी एका नगरपंचायतीची धुरा लाडक्या बहिणी सांभाळणार आहेत. २७८ पैकी १४७ महिला नगरसेवक पदी निवडून आल्यात विशेष म्हणजे पुरुष नगरसेवकांपेक्षा लाडक्या बहिणींचा नगरसेवक म्हणून अधिक बोलबाला आहे. १२ नगरपरिषदा नगरपंचायतीत केवळ १३१ पुरुष नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करणार आहेत त्यामुळे नगर परिषदा, नगरपंचायतींचे सभागृह चालवताना व प्रशासनाचा गाळा हागताना महिला प्रतिनिधींची भूमिका आणि त्यांच्या मताला विशेष महत्त्व असणार आहे. राज्यात २०११ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या १० नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या २७८ जागांपैकी १४७ महिला निवडून आल्यात १३१ इतके पुरुष नगरसेवक आहेत.
१२ पैकी आठ ठिकाणी लाडक्या बहिणी नगराध्यक्ष
दहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतीसाठी पार पडलेल्या निवडणुकीत अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, शेंदुर्जना घाट, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, या नगरपरिषद व नांदगाव नगरपंचायतीत लाडक्या बहिणी नगरपरिषद व नगरपंचायतींचा गाडा हाकणार आहेत. अंजनगाव सुर्जी चिखलदरा धारणी आणि वरुड या ठिकाणची कमांड लाडक्या भावाकडे राहणार आहे.
पालिका निहाय सदस्य व नगरसेवक संख्या
सदस्य संख्या महिला पुरुष
अचलपूर ४१ २२ १९
अंजनगाव २८ १४ १४
चांदूरबाजार २० ११ ०९
चांदूर रेल्वे २० १० १०
चिखलदरा २० १२ ०८
दर्यापूर २५ १४ ११
धामणगाव १७ १० ०७
मोर्शी २४ १२ १२
नांदगाव खंडे. १७ ०९ ०८
शेंदुर्जना घाट २0 १० १०
वरुड २६ १३ १३





