६९ फिल्ममधून जिंकली मनं, वयाच्या दहाव्या वर्षी पदार्पण; सुपरस्टारचा सिनेविश्वाला रामराम…

SHARE:

मनोरंजन विश्व् – सिनेविश्व आणि त्यातील कलाकारांवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात. त्यांचे सिनेमे तर अक्षरशः डोक्यावर घेतात. पण, काही असे सेलिब्रिटीही आहेत, जे यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही इंडस्ट्रीला कायमचा अलविदा करतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे, साऊथ सुपरस्टार थलपती विजय. अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत एकापेक्षा एक हिट सिनेमे देणाऱ्या विजय थलपतीनं अखेर इंडस्ट्रीला कायमचा अलविदा म्हटलं आहे. थलपती विजयचा अखेरचा सिनेमा ‘जाना नायकन’ ९ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आपल्या लाडक्या सुपरस्टारनं इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते भावूक झाले आहेत. अलिकडेच, सिनेमाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात, विजय थलपती काहीसा भावूक होताना दिसला, त्याच्या डोळ्यात अश्रुही तराळले होते. सिनेमानंतर, विजय आता पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रीत करेल.

‘जाना नायकन’ मध्ये या स्टार्ससोबत झळकणार विजय थलपती.
थलपती विजयचा शेवटचा सिनेमा, ‘जाना नायकन’ मध्ये बॉबी देओल, पूजा हेगडे, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण आणि प्रियामणी मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हा सिनेमा एच. विनोद यांनी दिग्दर्शित केला आहे. विजय तलपथीनं अनेक वर्ष इंडस्ट्रीवर राज्य केलं. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेल्या या सुपरस्टारनं अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. त्यांचा सर्वात प्रसिद्ध सिनेमा म्हणजे, लिओ (६१५  कोटी), गोट (४६०  कोटी), बिगिल (३०४  कोटी), वारिसु (३०३ कोटी) आणि मेर्सल (२५७  कोटी) या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलंय.

विजय थलपतीचं नेटवर्थ किती?
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, विजय थलपतीचं नेटवर्थ ४७४  कोटी आहे. तो सर्वाधिक कमाई फिल्म्समधून करतो. मीडिया रिपोर्टनुसार, विजय थलपती एका फिल्मसाठी १३० कोटींहून २०० कोटी रुपयांपर्यंत चार्ज करतो. याव्यतिरिक्त तो कित्येक ब्रांड एंडोर्समेंट्समधूनही मोठी कमाई करतो. थलपती विजय रियल इस्टेटमध्येही इन्वेस्टमेंट करतो.

दरम्यान,थलपती विजयबद्दल बोलायचं झालं तर, त्याचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे एक दिग्दर्शक आहेत. त्यांची आई शोभा चंद्रशेखर ही एक पार्श्वगायक आणि गायिका आहे. अभिनेत्याचे वडील ख्रिश्चन आहेत आणि आई हिंदू आहे. विजयला विद्या नावाची एक बहीण देखील आहे. विजयनं १९९९  मध्ये श्रीलंकेतील तमिळ महिला संगीता हिच्याशी लग्न केलं. विजय थलपतीला संजय आणि दिव्या अशी दोन मुलं आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा