नवी दिल्ली – भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट पकडण्यात आली आहे, तर याप्रकरणात ९ जणांना अटक करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा भारतात काही दहशतवादी कारवायाचा करण्याचा डाव तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, भारतीय जवानांनी पाकिस्तानचा एक मोठा कट, समुद्र तटावरच उधळून लावला आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ’अल मदीना’ या समुद्र बोटीला ताब्यात घेतले आहे. तर या बोटीतून भारतीय हद्दीत येणाऱ्या 9 जणांच्या अटक केले आहे, याचा तपास भारतीय सैन्य दलाकडून होत आहे.
भारतात काही दिसावपुर्वी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पहलगामध्ये निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तर त्यामध्ये, २० पेक्षा जास्त भारतीय मृत्यूमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तर, सरकारने या हल्ल्याची दखल घेत, पाकिस्तानवर एअर स्ट्राईक घडवून आणला होता. त्यामुळे, दोन्ही देशातील सीमारेषेवर अधिकच तणाव निर्माण झाला होता. मात्र, जागतिक स्तरावरील चर्चेनंतर, दोन्ही देशांच्या सैन्य दलाने युद्धविराम दिला. मात्र, आता भारतीय समुद्र सीमारेषेवर गुजरातजवळ, भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानचा मोठा डाव उधळून लावला आहे.
भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानची, अल मदीना नावाची बोट पकडली आहे. त्यातील ९ जणांना अटक केली आहे. या सर्व संशयितांना गुजरातच्या पोरबंदर येथे आणले जात आहे. भारताची समुद्र सीमा आता सर्वसाधारण नाही, हे भारतीय सैन्य दलाने दाखवून दिले आहे. अरबी समुद्रात १४ जानेवारी २०२६ च्या या मध्यरात्री मोठा काळोख असताना, भारतीय तटरक्षक दलाची बोट पेट्रोलिंग करत होती. त्यावेळी, समुद्र तटावर एक संशयीत हालचाल दिसून आल्याने, भारतीय सैन्याने गंभीर दखल घेऊन पाठलाग केला.
आंतरराष्ट्रीय समुद्र सीमा रेषेवर भारतीय हद्दीत एक बोट, शांतपणे पुढे जात होती. ही केवळ मच्छिमार करणारी बोट नव्हती, तर त्यातील सर्वांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे, भारतीय सैन्य दलाची बोट तिकडे जाताच, त्या बोटीने पाकिस्तानच्या दिशेने पिछेहाट केल्याचे दिसले. तसेच, पाकिस्तानी बोटीने आपला, स्पीडही वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी या बोटीला पकडले आहे. या बोटीसह 9 जणांना पोरबंदर येथील सीमा रेषेवर आणण्यात आले आहे. तर भारतीय सुरक्षा एजन्सी व एटीएसनेही या बोटीतील संशयितांचा अधिकृत तपास सुरू केला आहे.





