पुण्यामध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून, इंजिनियर महिलेची आत्महत्या; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दिवसेंदिवस वाढ

SHARE:

पुणे – उरळीकांचन मधे सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनियर महिलेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये उरुळी कांचन जवळील, सोरतापवाडीच्या भाजप पक्षाकडून सरपंच पदासाठी उमेदवार झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत. सासू भाजप पक्षाकडून उरुळी कांचन जवळील, सोरतापवाडीच्या सरपंच आहेत, सासरे शिक्षक आहेत, तरी पैशांसाठी सुनेला त्रास दिला आहे. या त्रासाला कंटाळून इंजिनियर महिलेने जीवन संपवले आहे.

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून, इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडीमधील ही घटना आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेची सासू ही भाजप पक्षातून सरपंच आहे ,तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. उरुळीकांचन पोलिसांनी याप्रकरणात ४  जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दीप्ती मगर चौधरी, असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरातच या महिलेने आत्महत्या केली आहे.

या महिलेच्या आत्महत्येनंतर पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन चौधरी, सुनीता चौधरी, कारभारी चौधरी, रोहित चौधरी या सर्वाना पोलिसांनी अटक केली आहे. २०१९ ला दिप्ती व रोहनचा विवाह झाला होता. लग्नात ५० तोळे सोने दिले होते. नंतर विवाहितेवर वेगवेगळे आरोप केले आहेत, एक महिन्यानंतर तिला सासरकडून, मानसिक व शारिरीक छळ सुरू झाला, तिच्यावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाही, असे आरोप करत तिला त्रास देण्यात आला. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी, तिच्या घरच्यांनी १० लाख रुपये कॅश दिली आहे, तर गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते.

मात्र तरीही या महिलेला त्रास देत होते. त्या महिलेने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणात मृत महिलेच्या आईने, पोलिसांत तक्रार दिली आहे. सासरच्या लोकांनी त्रास दिल्याचे, मृत महिलेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा