नाशिकमध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या मूलाने, चार चाकीने दोन जणांना उडवले; हिट अँड रन च्या केसेस मधे सतत वाढ

SHARE:

नाशिक – शासकीय कर्मचाऱ्याच्या मूलाने, चार चाकीने दोन जणांना उडवले आहे. नाशिकमध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला आहे. नाशिकमधील एका सरकारी अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाने चार चाकी गाडीने दोघांना उडवले आहे, नाशिकमधील घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. नाशिक शहरात हिट अँड रनची ही नाशिकमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात ही घटना घडली आहे. एका वेगाने आलेल्या चारचाकी कारने, पुढे जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. तर या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, या प्रकरणात नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात ही हिट अँड रनची .घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून वेगाने येणार्या एका कारने, त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. धडक इतकी जोरात होती की ,दुचाकीवरील दोघे खाली पडले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला, मात्र ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. या अपघात प्रकरणात गंगापूर पोलिसांनी ,संबंधित चारचाकी गाडीचा शोध घेतला आहे. हा अपघात करणारा मुलगा अल्पवयीन असून, तो शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या घटनेचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणाऱ्या, पालकांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊन, नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नये , असे नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. या प्रकरणात पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा