केदारनाथ, बद्रीनाथ आणि राम मंदिर पूर्वी बौद्ध विहार होते, भाजप नेते शिशुपाल सिंह शाक्य यांचा दावा

SHARE:

नवी दिल्ली – सम्राट अशोकांनी भारतात ८४ हजार बौद्ध विहारे बांधली होती. मात्र आता या ८४ हजार बौद्ध विहरांपैकी गया येथील महाबोधी विहार सोडले तर एकही दिसून येत नाही. इतिहासकारांचा दावा आहे कि या बौद्ध विहारांचे मंदिरात रूपांतर केल्या गेले. दरम्यान उत्तर प्रदेशातील भाजप नेते शिशुपाल सिंह शाक्य यांनी देखील असाच दावा केला आहे. ते म्हणाले कि केदारनाथ, बद्रीनाथ आणि राम मंदिर पूर्वी बौद्ध विहार होते.

विजयनंगला गावात आयोजित बुद्ध कथा कार्यक्रमादरम्यान त्यांनी खुल्या मंचावरून हा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.
बदायूंमधील भाजप नेते आणि उज्जैनी ब्लॉक प्रमुख शिशुपाल सिंह शाक्य यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ते देशातील प्रमुख धार्मिक स्थळे, केदारनाथ, बद्रीनाथ आणि अयोध्येतील राम मंदिर याबद्दल मोठा दावा करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये शिशुपाल सिंह शाक्य असे म्हणत आहेत की केदारनाथमधील शिव मंदिर, बद्रीनाथमधील विष्णू मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिर हे मूळतः बुद्ध विहार होते. त्यांनी दावा केला की ही स्थळे नंतर मंदिरात रूपांतरित करण्यात आली.

विजयनंगला गावात आयोजित बुद्ध कथा कार्यक्रमादरम्यान त्यांनी खुल्या मंचावरून हा दावा केला. त्यांच्या विधानाचा हा व्हिडिओ मोबाईल फोनवर रेकॉर्ड करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच सामाजिक चर्चा देखील तीव्र झाल्या आहेत.

दरम्यान, शिशुपाल सिंह शाक्य यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की त्यांनी बुद्धकथेला उपस्थित राहून भगवान बुद्धांच्या जीवनावर, त्यांच्या विचारांवर आणि अहिंसेच्या संदेशावर आपले विचार व्यक्त केले होते. त्यांनी कोणत्याही धर्माला किंवा श्रद्धेला दुखावण्याच्या उद्देशाने विधान केले नाही.

माहित असावे कि हा देश केवळ आणि केवळ बुद्धांचा आहे, राम आणि कृष्णाचा नाही. या देशातील मोठे नेते आणि उद्योगपती जेव्हा विदेशात जातात तेव्हा तेथील लोकांना सांगतात कि मी बुद्धांची भूमी भारत देशातून आलो आहे. मात्र हेच नेते आणि पूंजीपती भारतात आल्यावर हा देश राम आणि कृष्णाचा असल्याचा खोटा कांगावा करतात. महत्वाचं म्हणजे आपपर्यंत पूरातत्व विभागाला राम आणि कृष्णाबद्दल उत्खननात कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत. अयोध्येत देखील रामाचे मिळालेले नाहीत.

Leave a Comment

अधिक वाचा