मुंबईत प्रजासत्ताक दिनी, लहान मुलांना बेदम मारहाण

SHARE:

मुंबई – प्रजासत्ताक दिनी, लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर मुंबईत ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सगळीकडे असताना, मात्र मुंबईतील एका परिसरात या उत्साहाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. दोन गटात हाणामारी झाली आहे.

मुंबईत प्रजासत्ताक दिनी झेंडा घेऊन जाणार्या व घोषणा देणाऱ्या लहान मुलांना बेदम मारहाण केल्यामूळे वाद वाढला आहे. भारतात काल ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस आनंदाचा असतो. काल मुंबईतील घाटकोपर येथील नित्यानंद परिसरात, झेंडा घेऊन फिरणाऱ्या व घोषणा देणार्या लहान मुलांना, जबर मारहाण करण्यात आली आहे, या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

घाटकोपरच्या नित्यानंद नगर मध्ये, तिरंगा झेंडा घेऊन फिरत असलेल्या, लहान मुलांना मारहाण केल्याने , दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. लहान मुले घराबाहेर तिरंगा घेऊन घोषणा देत असल्याचा, एका व्यक्तीला राग आला, त्याने या मुलांना बेदम मारहाण केली. त्या मुलांना घोषणा देण्यापासून रोखले आहे. यावरून वाद वाढला आणि घाटकोपरच्या नित्यानंदनगरमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही समुदायाच्या गटातील लोकांना, घाटकोपर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले आहे. घाटकोपर पोलीस पुढील कारवाई करीत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा