मंत्रालयातील लाचप्रकरणात राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, तर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणी वाढणार

SHARE:

मुंबई – मंत्रालयातील लाचप्रकरणात राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीने धाड टाकली आहे, तर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणी वाढणार आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाचखोर राजेंद्र ढेरंगे याची विभागातील प्रतिनियुक्ती रद्द करून पुन्हा अन्न व नागरी पुरवठा विभागात पुन्हा पाठविण्याची विनंती केली आहे. मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले होते. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

मंत्रालयातील आपल्या कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना सापडल्यामुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले होते. याप्रकरणात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर याप्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणी लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. एसीबीने राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेतली आहे. या घरातून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत.

त्यामुळे आता या प्रकरणात आता आणखी नवीन माहिती मिळाली आहे. राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभाग येथे तो प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत आहे. आता राजेंद्र ढेरिंगेच्या घरातून एसीबीच्या हाती जी कागदपत्रे लागली आहेत, त्यामुळे चौकशीला आणखी वेग येणार आहे. आज ही कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाणार आहेत. तेव्हा एसीबीचे अधिकारी न्यायालयात माहिती सांगणार आहेत.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हालचालींना वेग आला आहे. नरहरी झिरवळ यांचा फोन सध्या स्वीच ऑफ आहे. ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नरहरी झिरवळांच्या प्रकरणाबाबत चर्चा होणार आहे. या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी राजीनामा देईन.

माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहेच, ही जबाबदारी नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केले आहे, त्या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली होती. आता राज्यातील मंत्रालयातील लाच प्रकरणाने मंत्री नरहरी झिरवळ अडचणी वाढल्या आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा