मुंबई – आखातातील युध्दामूळे भारतात कॅटरिंग व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे, तर युध्दाचा परिणाम भारतातील अनेक राज्यातील एलपीजी पुरवठ्यावर झाला आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात ही इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम राज्यातील एलपीजी पुरवठ्यावर झाला आहे. युध्दाचा परिणाम घरातील गॅसवरती झाला आहे, मात्र यामुळे राज्यातील हजारो लग्नसोहळे पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरात लग्न सोहळे होणार आहेत. मात्र हे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
भारतात युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक शहरातील केटरर्स हे लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करत आहेत, केटरर्सकडून तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात अनेक शहरात लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर आली आहे. त्यातून गॅसची जुळवाजुळव केल्यास, केटरर्स १० ते २० टक्के दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लग्न सोहळ्यात उत्तम जेवण हवे असल्यास ते महाग पडणार आहे. मात्र गॅस उपलब्ध झालाच नाही तर, मात्र राज्यातील केटरर्स व्यावसायिकांचे आणखी जास्त नुकसान होणार आहे.
राज्यात हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. याचा राज्यातील अनेक जिल्ह्यातील केटरर्स व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे. राज्यातील अनेक शहरात लग्नाचा मुहूर्त असणाऱ्या दिवशी ४०० ते ५०० लग्न सोहळे होतात. राज्यात एप्रिल आणि मे अशा २ महिन्यातील ३० मुहूर्तांना अनेक शहरात किमान १० ते १२ हजार लग्न सोहळे पार पडतात.
या लग्न सोहळ्यांच्या जेवणाची ऑर्डर राज्यातील प्रत्येक शहरातील नोंदणीकृत केटरर्स तसेच अन्य छोटे केटरर्स घेतात. मात्र लग्न सराईच्या महिन्यात राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हे केटरर्स व्यावसायिक घेतलेल्या ऑर्डर रद्द करु लागले आहेत. युध्दजन्य परिस्थितीमुळे राज्यातील अनेक शहरातील लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास राज्यातील केटरर्स व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.





