जळगाव – पेट्रोल पंप घोटाळा प्रकरणात फरार पोलिस उपनिरीक्षक जळगाव पोलिसांसमोर हजर झाले आहेत. जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोलपंप घोटाळा प्रकरणातील फरार पीएसआय वाल्मीक वाघ पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्याच्यावर १ कोटी ३३ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. जळगाव पोलीस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोल पंपावरील भ्रष्टाचार प्रकरणात फरार असलेले पेट्रोलपंप व्यवस्थापक अथवा पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ जळगाव पोलिसांसमोर हजर झाले आहेत.
या प्रकरणात जळगाव पोलिसांकडून त्यांच्यासह त्यांचा मुलगा शेखर वाघ यालाही अटक करण्यात आली आहे. पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपाच्या व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. तपासात त्यांनी १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण समोर आले होते. भ्रष्टाचार समोर आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांनी चौकशीत १० ते १५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असे म्हटले आहे. पोलिसांकडून भ्रष्टाचाराची रक्कम नेमकी किती? आणि ती कशाप्रकारे वापरली? याबाबत जळगाव पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ पिता-पुत्राला न्यायालयात हजर केले आहे. तर न्यायालयाकडून दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास जळगाव पोलिस करत आहे.





