मुंबई – भाजपा सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल झाली आहे, तर देशात गॅस एजन्सीबाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमु लागली आहे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे. देशातील भाजपा सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या गोष्टी करते आहे, आणि बुकिंगचा कालावधी वाढवते आहे, तर हे भाजपा सरकार देशातील लोकांना फसवत आहे. देशात वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील भाजपा सरकार गॅस सिलिंडरचे साठे पुरेसे असल्याचा दावा करत आहे, तर प्रत्यक्षात देशभरात गॅस एजन्सींबाहेर लागलेल्या लोकांच्या रांगा आणि बंद पडणाऱ्या खाणावळी यातून देशातील गॅस तुटवड्याचे वास्तव लोकांना दिसत आहे.
भाजपा सरकारच्या भंपक दाव्यांपेक्षा भारतात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. मग भाजपा सरकार नेमके कुणाला फसवत आहे?” असा प्रश्न ठाकरे शिवसेनेने उपस्थित केला आहे. जगातील अनेक देशांत इंधनटंचाई निर्माण झाल आहे. बहुतांश देशांना पेट्रोल, डिझेल व एलपीजी सिलिंडरचा पुरवठा आखाती देशांतूनच होत होता. इराणने जहाजांच्या वाहतुकीवर बंदी आणल्यामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे इंधन व एलपीजी सिलिंडरचे साठे कमी होत चालले आहेत. आणि युद्धामुळे नवा इंधन पुरवठा थांबल्यामूळे अनेक देश संकटात आहेत.
भारतामध्ये तर स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. केंद्रातील भाजपा सरकार गॅस टंचाईवर कितीही बोलत असले, तरी प्रत्यक्षात भारत देशात स्थिती भयानक बनली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ३० टक्कयांहून अधिक रेस्टॉरंट, हॉटेल व्यवसाय बंद झाले आहेत. देशात स्वयंपाकाचा व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरांतील छोटे-मोठे व्यवसाय बंद पडत आहेत. देशभरात गॅसच मिळत नसल्याने अनेक छोटी उपाहारगृहे व खाणावळी बंद पडू लागल्या आहेत.
यामुळे शिक्षणासाठी व कामासाठी शहरांत गेलेल्या विद्यार्थी आणि कष्टकरी वर्गाचे हाल होत आहेत. उद्योगांचा गॅसपुरवठा देशातील भाजपा सरकारने आधीच बंद केला आहे. त्यामुळे देशभरातील अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या बंद पडल्या आहेत. शिवाय आहे तो गॅसचा साठा संपला की, येत्या काही दिवसांत देशभरातील हजारो कंपन्या व कारखाने बंद पडण्याचा धोका वाढला आहे. लाखो कामगारांवर उपाससमारीची वेळ आली आहे. देशातील केटरिंग व्यवसायावर मोठे संकट आले आहे. देशात गॅस टंचाईमुळे लग्न समारंभांच्या जेवणाची कंत्राटे घेणाऱ्या केटरिंग व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी जास्त खर्च होत असल्याने अनेक केटरिंग व्यावसायिकांनी मंगलकार्याच्या ऑर्डर्स घेणे बंद केले आहे.
मार्च-एप्रिल या महिन्यात मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे पर्यटनस्थळांवरील ओघही कमी झाला आहे. गॅसचा पुरवठा अगदी सुरळीत सुरू आहे, असे दावे भाजपा सरकारच्या वतीने करण्यात येत असले तरी, गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या प्रचंड रांगा सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करीत आहेत. मुंबई-पुण्यातच नव्हे तर देशातील अनेक राज्यात, व मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर या मोठ्या शहरांतही घरगुती गॅस सिलिंडरच्या गॅस एजन्सींबाहेर ग्राहक तासनतास रांगेत उभे राहिलेले दिसत आहेत. पुण्यामध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृहांतील खाणावळींनी जेवणातून पोळी-भाजी बादच केली आहे.
गॅस टंचाई दूर होत नाही तोपर्यंत पोळी ऐवजी वरणभातच खावा लागेल, असे मेसेज वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर धाडण्यात आले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅस एजन्सींबाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. मुंबईतील मोठ्या सोसायट्या व निवासी संकुलांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू मिळत असला तरी पश्चिम उपनगरांतील कांदिवलीपासून पूर्व उपनगरांतील धारावी ते भांडुपपर्यंत गॅस एजन्सींबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात पश्चिम आशियातील युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. तरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी मात्र देशात गॅस सिलिंडरचे पुरेसे व सुरळीत असल्याचे सांगतात.
देशातील कोट्यवधी कुटुंबांच्या घरात स्वयंपाकासाठी गॅसची टंचाई भासणार नाही, याची काळजी घेण्यास आमचे सरकार प्राधान्य देत आहे. देशात इंधनाची कमतरता तर आहे. परंतु गॅस उत्पादन वाढीची माहिती खरी असेल तर देशभरातील गॅस एजन्सींबाहेर ग्राहकांच्या रांगा का लागल्या आहेत? व देशातील लहानमोठी उपाहारगृहे आणि खाणावळी बंद का पडत आहेत? याचे उत्तर भाजपा सरकारच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी जनतेला द्यायला हवे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे.





