राशीभविष्य – आज २२ मार्च २०२६ , आजचा वार रविवार आहे. नुकतीच चैत्र महिन्याला सुरूवात झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीसाठी आजचा दिवस राजकारणी लोकांना आपल्या मनाप्रमाणे काम करून घेण्याची संधी मिळेल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस मी मी म्हणणाऱ्यांना गारद कराल, चित्रकला फोटोग्राफी यांची आवड असणारे चांगल्या कलाकृती निर्माण करतील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागण्यात सफल व्हाल, महिला बौद्धिक गोष्टीत रस घेतील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीसाठी आजचा दिवस दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हाल, असे प्रसंग वारंवार येतील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीसाठी आजचा दिवस रागाचा पारा जरा जास्त चढेल, जोडीदाराच्या आरोग्या संदर्भात काळजी घ्यावी लागेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीसाठी आजचा दिवस कोणतेही खूप पथ्य, अति कष्ट किंवा अति ताण प्रकृतीला झेपणार नाही.
तूळ रास (Libra)
तूळ राशीसाठी आजचा दिवस स्वतःच्या मताशी ठाम राहाल, कोणतीही तडजोड करण्याच्या मनस्थितीत राहणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हाताखालच्या लोकांच्या मानी स्वभावाला तोंड द्यावे लागेल, तुमच्या कामांमध्ये घरातील लोकांचा सहभाग असेल.
धनु रास (Saggitarius)
धनु राशीसाठी आजचा दिवस महिला घरातील लोकांच्या मर्जीस उतरतील, घरामधील अस्थिरता वादविवाद संपुष्टात येतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीसाठी आजचा दिवस ग्रह सौख्यात भर पडेल, घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मताप्रमाणे वागावे लागेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस इतरांच्या अनुभवाचा फायदा होईल, फक्त आपल्या विचारांचा दृष्टिकोन बदलावा लागेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात नवनवीन संशोधन करून वरिष्ठांना खुश ठेवाल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





