भारतीय नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा सीबीआयकडून भांडाफोड; परदेशात बंदी ठेवून गुन्हेगारी साठी युवकांचा वापर

SHARE:

मुंबई – भारतीय नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून मानवी तस्करी करणार्या टोळीचा सीबीआयकडून भांडाफोड करण्यात आला आहे. भारतीय तरुणांना परदेशात विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पकडण्यात आले आहे. मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर या परदेशात गेलेल्या तरुणांना कैदेत ठेवले जायचे. तिथे त्यांना गुन्हे करण्यासाठी जबरदस्ती केली जायची. भारतीय नागरिकांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मानवी तस्करी करणाऱा प्रकार उघडकीस आला आहे.

एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीला सीबीआयने पकडले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लाथू रामकृष्णन याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. सुनील हा म्यानमारमधील कुख्यात सायबर फसवणूक केंद्रांमध्ये भारतीयांना गुलाम म्हणून विकण्याचे काम करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तिथे त्यांना जबरदस्तीने डिजिटल अरेस्ट आणि क्रिप्टो करन्सी फसवणूक करण्यात लावले जात होते. पीडितांना कैदेत ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.

माहितीनुसार, हे रॅकेट भारतातील सुशिक्षित तरुणांना थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवुन फसवायचे. पीडितांना आधी दिल्ली आणि तिथून बँकॉकमार्गे विमानाने नेले जायचे. मात्र, थायलंडला पोहोचल्यानंतर त्यांना रस्तेमार्गे म्यानमारमधील के के पार्क परिसरातील सायबर गुन्हेगारी केंद्रांमध्ये नेले जात होते.
म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर या तरुणांना कैदेत ठेवले जायचे. तिथे त्यांना खालील गुन्हे करण्यासाठी जबरदस्ती केली जायची, भारतातील लोकांना फोन करून पोलीस असल्याचे भासवून लुटणे. सोशल मीडियावरून प्रेमाचे नाटक करून फसवणूक करणे. गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांचे पैसे लाटणे. या कामाला नकार देणाऱ्या पीडित नागरिकांचा प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे.

२०२५ मध्ये काही पीडित भारतीय नागरिकांनी पळ काढला आहे. थायलंडमार्गे भारतात परतल्यानंतर त्यांनी ही घटना सांगितली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सीबीआयने तपास केला आहे. सुनील उर्फ कृष याची या प्रकरणातील मुख्य भूमिका उघडकीस आली आहे. सुनील कृष हा नुकताच मुंबईत परतल्याची माहिती मिळताच सीबीआयने त्याला अटक केली आहे. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे, लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरून या रॅकेटमध्ये आणखी किती लोक अडकले आहेत, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सीबीआय घेत आहे.

माहितीच्या आधारे, सीबीआयने या बेकायदेशीर कृत्यांमागील मुख्य सूत्रधारांची ओळख पटवण्यासाठी अत्यंत बारकाईने तपास केला आहे. या मानवी तस्करीच्या जाळ्यात कृष हा एक प्रमुख दलाल आणि किंगपिन मुख्य सूत्रधार म्हणून समोर आला आहे. दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये पीडित भारतीय नागरिकांची बेकायदेशीर वाहतूक आणि त्यांचे शोषण करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या आरोपीच्या हालचालींवर सीबीआयची नजर होती.

तो नुकताच भारतात परतल्यानंतर सीबीआयने त्याला मुंबईतून अटक केली आहे. कृषच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली आहे. तिथे म्यानमार आणि कंबोडियामधील मानवी तस्करीच्या ऑपरेशन्सशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे आणि गुन्हेगारी सिद्ध करणारे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या जाळ्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा आणि विदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी तसेच या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, या प्रकरणात अधिक तपास सीबीआयकडून सुरू आहे.

Leave a Comment

अधिक वाचा