गावठी कट्ट्यातून झालेल्या मिसफायरिंगमुळे ३५ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू ; आरोपी मित्रांविरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल

SHARE:

जळगाव – जिल्ह्यात गावठी कट्ट्यातून झालेल्या फायिंरगमुळे ३५ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात ही घटना घडली आहे. अमळनेर शहरात गावठी कट्टयाची माहिती देत होता, तेवढ्यात गावठी कट्टयातुन गोळी सुटल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मित्रांच्या गप्पा चालु असताना ही घटना घडली आहे.

अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे. तो तरूण मंडप व्यवसायाशी संबंधित होता. अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री एका गावठी कट्ट्यातून झालेल्या मिसफायरमुळे ३५ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने अमलेश्वर नगर परिसरात खळबळ उडाली आहे. अमळनेर पोलिसांकडून आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत माळीवाडा परिसरात गप्पा मारत बसला होता. यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन हा आपल्याजवळील गावठी कट्टयाबद्दल व पिस्तूलाची माहिती देत होता. तो कट्टा हाताळत असताना अचानक त्यातून मिसफायर झाले आणि गोळी अरुण महाजनला लागली आहे. गोळी लागताच अरुण महाजन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी भूषण महाजन याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात हा अपघात वाटत असला तरी, पोलिसांकडून अनेक बाजूने तपास सुरू आहे. कट्टा कोठून आला? भूषण महाजन याच्याकडे हा बेकायदेशीर गावठी कट्टा कोठून आला? आणि कशासाठी आला? वाद झाला होता का? गोळी सुटण्यापूर्वी मित्रांमध्ये काही वाद झाला होता का? की हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार आहे? या घटनेत अधिक तपास अमळनेर पोलीस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा