देशात गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे राहून नागरिकांचे मृत्यू होत आहेत याला भाजपा सरकारच जबाबदार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपा सरकारवर आरोप

SHARE:

नागपूर – देशात गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे राहून नागरिकांचे मृत्यू होत आहेत याला भाजपा सरकारच जबाबदार आहे, असा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपा सरकारवर आरोप केला आहे. भोंदू अशोक खरातचा पेनड्राइव्ह उघडला तर सरकारमधील काही जणांची नावे बाहेर येतील, असा विजय वडेट्टीवारांनी खळबळजनक दावा केला आहे. बड्या नेत्यांच्या अंधारातील पापांची चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. अमावस्येच्या रात्री अनेक बडे नेते भोंदू अशोक खरातच्या घरी जात होते. अंधारात आपली पापे झाकत होते. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून भाजपा सरकारला इशारा दिला आहे. मंत्री दीपक केसरकर म्हणतात ३९ आमदार भोंदू अशोक खरातला भेटायला जायचे, मग त्यांनी ही यादी जाहीर का केली नाही? जर भोंदू अशोक खरातचा पेनड्राइव्ह उघडला, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल आणि हे भाजपा सरकार अडचणीत येईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बड्या नेत्यांची अंधारातील पापे झाकण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे हे नेते जात होते. विजय वडेट्टीवार यांनी भोंदू अशोक खरातला भेटणाऱ्या बड्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, अमावस्येच्या रात्री अनेक बडे नेते खरातच्या घरी जात होते. अंधारात आपली पापे झाकण्यासाठी हे नेते तिथे भोंदू अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. भोंदू अशोक खरातला साथ देणारे आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवणारे अनेक उच्चपदस्थ लोक आहेत. या सर्वांची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे. केवळ एसआयटी कडून काही तपास होणार नाही, या प्रकरणाची कायदेशीर चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखी खालीच व्हायला हवी. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार भोंदू अशोक खरात आणि त्याला राजकीय सहकार्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित करताना विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, मोठ्या राजकीय लोकांना वाचवण्यासाठी भोंदू अशोक खरातचे बरे-वाईट केले जाऊ शकते. जसा बदलापूर प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तसाच प्रकार इथेही भोंदू अशोक खरातबाबत घडू शकतो. पुरावे नष्ट करण्यासाठी भोंदू अशोक खरातला मारून टाकण्याची भीती आहे, सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे. देशात रोज गॅस सिलेंडरच्या रांगेत नागरिक मरत आहेत. देशातील एलपीजी गॅस टंचाईवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे.

केंद्रातील भाजपा सरकारने देशाला वाऱ्यावर सोडले आहे. भारतात केवळ निवडणुका जिंकणे आणि सत्ता मिळवणे हेच भाजपा सरकारचे काम आहे. भारतात गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे राहून रोज नागरिकांचे मृत्यू होत आहेत, याला केंद्रातील भाजपा सरकारच जबाबदार आहे. इराणसारखा मित्र देश आज आपल्या परराष्ट्र धोरणामुळे शत्रू झाला आहे. भारतात रोज हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान वाद निर्माण करून देशाचा विकास होणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

देशातील भारतीय जनता पक्ष हा दक्षिण आफ्रिकेतील अॅनाकोंडाचा बाप आहे. जो त्यांच्या पोटात जातो, तो पुन्हा दिसत नाही. देशातील भाजपा पक्ष हा एकेक छोट्या पक्षाला कमकुवत करण्याचे काम करत आहे. कारण देशातील भाजपा सरकार छोट्या प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्याचे काम करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा