राज्यात शिक्षण मंडळाचा मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट एकत्रित करण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांना एकच कॉम्बो प्रमाणपत्र दिले जाणार

SHARE:

पुणे – राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आणि विद्यार्थ्यांना एकच कॉम्बो प्रमाणपत्र दिले जाणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा गोंधळ आता संपणार आहे. कारण आता मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट एकत्र मिळणार आहेत.माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि प्रशासकीय सुधारणा करणारा निर्णय घेतला आहे. राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ पासून बोर्डाच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र यांसाठी दोन वेगळे कागदपत्रे सांभाळावी लागणार नाहीत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे दोन्ही प्रमाणपत्रे एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना एकच कॉम्बो प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची धावपळ थांबणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेतही अडचणी येणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांचे ओझे कमी होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बोर्डाच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावर नावाचा क्रम बदलण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आडनाव प्रथम ही पद्धत आता बंद होणार आहे.

नवीन नियमानुसार, विद्यार्थ्यांच्या नावाचे स्वरूप विद्यार्थ्याचे स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे असणार आहे. हा बदल अधिक स्पष्ट असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांची ओळख पटवणे अधिक सोपे व्हावे आणि नावाचा गोंधळ टाळावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. २०२६  च्या बोर्डाच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना ही बदललेली नावे आपल्या प्रमाणपत्रावर पाहायला मिळणार आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात कोणतीही चूक राहू नये, यासाठी राज्यातील शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या रेकॉर्डवर किंवा हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचा फोटो अस्पष्ट असल्यास, तो त्वरित बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्याध्यापकांना त्यांच्या स्तरावर हे फोटो बदलून ते साक्षांकित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे नाव आणि फोटोंची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्याध्यापकांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची ओळख पटवताना कोणताही अडथळा येऊ नये, हा यामागचा मुख्य हेतू आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट अत्यंत बारकाईने तपासावे, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी केले आहे. अंतिम प्रमाणपत्रावर कोणत्याही चुका येऊ नयेत, यासाठी विद्यार्थ्यांनी आत्ताच सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हॉल तिकीटावरील नावाचे स्पेलिंग, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव किंवा फोटो यामध्ये काहीही चुक आढळल्यास, विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. मुख्याध्यापकांच्या माध्यमातून या चुका वेळेत दुरुस्त करून घेता येतील. एकदा का निकाल जाहीर झाला की दुरुस्तीची प्रक्रिया कठीण होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही पडताळणी लास्ट मिनिट पर्यंत न थांबवता आत्ताच पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात बोर्डाच्या गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र एकत्र करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे.

भविष्यातील प्रशासकीय प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. दोन स्वतंत्र कागदपत्रे सांभाळण्याऐवजी आता एकाच दस्तऐवजात सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. पडताळणीची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना दोन वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची तपासणी करावी लागत असे. मात्र, आता सिंगल डॉक्युमेंट धोरणामुळे ही पडताळणी वेगाने पूर्ण होईल. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. कागदपत्रे गहाळ होण्याची भीतीही उरणार नाही.

Leave a Comment

अधिक वाचा

आजचे राशिभविष्य २३ एप्रिल २०२६: कुठल्या संकटांची आणि सुखाच्या दिवशी मध्ये आपल्याला काही समस्या अनुभवायच्या असतील की सुखाचे दिवस दिसणार? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी गुरूवार कसा जाणार? राशिभविष्य पूर्णपणे वाचा.